Onion Rate: कांदा बाजारातून मोठं अपडेट, सोलापूर मार्केटमध्ये किती मिळतोय दर?
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Onion Rate: अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोलापूर मार्केटमध्ये कांदा दराबाबत महत्त्वाचं अपडेट आलं आहे.
इरफान पटेल, प्रतिनिधी
सोलापूर: राज्यात अवकाळी पावसाचा कांदा शेतीला मोठा फटका बसला आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक सुरू आहे. मागील आठवड्याभरापासून कांद्याचे भाव स्थिर दिसत आहे. चांगल्या कांद्याला सरासरी 13 रुपये ते 15 रुपये किलो दर मिळत आहे. याबाबत अधिक माहिती कांदा व्यापारी सादिक बागवान यांनी लोकल 18 शी बोलताना दिली आहे.
advertisement
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या कांद्याला सरासरी 13 ते 15 रुपये किलो दर मिळत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत मे महिन्यात कांद्याची आवक कमी आहे. त्यामुळे कांद्याचे दर सध्या स्थिर आहेत, अशी माहिती कांदा व्यापारी सादिक बागवान यांनी दिली. कांद्याला पुढील काळात चांगला भाव येईल या अपेक्षाने शेतकऱ्यांनी कांदा चाळणीमध्ये साठवून ठेवला आहे.
advertisement
अवकाळी पावसामुळे कांदा शेतीचे नुकसान
सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने कांदा पिकासह शेतीला फटका बसला आहे. काढलेला कांदा शेतातच भिजला असून काही शेतकऱ्यांचा कांदा शेतातच राहिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याचा परिणाम देखील कांदा मार्केटवर होत असल्याचे बागवान सांगतात.
advertisement
म्हणून कांद्याचे दर स्थिर
view commentsज्यावेळेस कांद्याला मागणी जास्त असते त्यावेळेस सरकार निर्यात शुल्क लागू करते. जेव्हा कांद्याची मागणी कमी असते तेव्हा शासन निर्यात शुल्क कमी करते. सध्या कांद्याला कोणत्याही इतर राज्यात मागणी नाही. त्यामुळे कांद्याचे दर स्थिर असल्याची माहिती कांदा व्यापारी सादिक बागवान यांनी दिली आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
May 18, 2025 11:21 AM IST








