Shet Rasta : शेत रस्ते, पाणंद रस्त्यांच्या कामात अडथळा आणाल तर फौजदारी गुन्हे दाखल होणार, महसूल मंत्र्यांनी दिले आदेश
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News : राज्यातील सर्व शेत रस्ते, पाणंद रस्ते आणि शीव रस्त्यांची हद्द निश्चित करून विकासकामे पूर्ण करण्याचे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला दिले आहेत. या कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध महसूल प्रशासनामार्फत फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे स्पष्ट निर्देशही त्यांनी दिले आहेत.
मुंबई: राज्यातील सर्व शेत रस्ते, पाणंद रस्ते आणि शीव रस्त्यांची हद्द निश्चित करून विकासकामे पूर्ण करण्याचे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला दिले आहेत. या कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध महसूल प्रशासनामार्फत फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे स्पष्ट निर्देशही त्यांनी दिले आहेत. पब्लिक डोमेनच्या माध्यमातून नागरिकांकडून आलेल्या सूचनांच्या अनुषंगाने मंत्रालयात गुरुवारी बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रत्येक गावात शेतरस्ता समिती तयार करणार
मंत्री बावनकुळे म्हणाले की, नागपूर जिल्ह्यात फक्त आठ ते दहा लाख रुपये प्रति किलोमीटर खर्च करून उत्कृष्ट दर्जाचे पाणंद रस्ते तयार करण्यात आले आहेत. ही कार्यपद्धती इतर जिल्ह्यांनी देखील आत्मसात करावी, असे आवाहन त्यांनी केले. प्रत्येक गावात शेत रस्ता समित्या स्थापन करून त्यांचे अहवाल शासनाला सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
advertisement
गुणवत्तेवर भर आणि प्रलंबित प्रकरणांचे निकालीकरण केलं जाणार
रस्त्यांचे काम दर्जेदार होईल याची खात्री करण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच पाणंद रस्त्यांशी संबंधित प्रलंबित प्रकरणे एका महिन्यात निकाली काढण्याच्या सूचना मंत्री बावनकुळे यांनी दिल्या आहेत. पाणंद, शेत रस्ते, तसेच सार्वजनिक रस्त्यांच्या मोजणीसाठी आणि पोलिस संरक्षणासाठी आकारली जाणारी फी रद्द करण्याचा विचारही सुरु आहे. रस्त्यांचे नंबरींग हटवणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाईल, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
advertisement
विदर्भातील भूदान जमिनींचा घेतला आढावा
बैठकीत विदर्भ भूदान यज्ञ मंडळाच्या नवीन कार्यकारिणीच्या स्थापनेच्या सूचनाही देण्यात आल्या. भूदान जमिनींच्या वाटपाचा आढावा घेतला असता, विदर्भात एकूण 17,280 हेक्टर भूदान जमीन असून त्यापैकी 14,860 हेक्टर जमिनीचे वाटप झाले आहे. उर्वरित 2,437 हेक्टर जमिनीचे वाटप अद्याप प्रलंबित आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 07, 2025 9:01 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
Shet Rasta : शेत रस्ते, पाणंद रस्त्यांच्या कामात अडथळा आणाल तर फौजदारी गुन्हे दाखल होणार, महसूल मंत्र्यांनी दिले आदेश