Success Story : 2 एकरात उभारला कृषी पर्यटन व्यवसाय, तरुणाची वर्षाला 25 लाखांची कमाई, 20 जणांना दिला रोजगार, Video
- Reported by:Kale Narayan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
शहरातील नागरिकांना गावगाड्याचे नेहमीच आकर्षण असते. कामाचा शीण हलका करण्यासाठी अनेकदा नागरिक सुट्टीवर फिरायला जातात.
जालना : शहरातील नागरिकांना गावगाड्याचे नेहमीच आकर्षण असते. कामाचा शीण हलका करण्यासाठी अनेकदा नागरिक सुट्टीवर फिरायला जातात. ग्रामीण संस्कृतीची झलक आणि रानमेव्याचा आस्वाद घेण्यासाठी कृषी पर्यटनाची संकल्पना पुढे येत आहे. जालन्यातील एका धडपड्या तरुणाने कृषी पर्यटन केंद्र उभारले असून या माध्यमातून ते वर्षाला 25 लाखांची कमाई करत आहेत. त्याचबरोबर 20 गरजूंना रोजगार देखील उपलब्ध करून देत आहेत.
पुणे, मुंबई सारख्या मोठ्या शहरांच्या आसपासच्या परिसरात कृषी पर्यटन मोठ्या प्रमाणात पहायला मिळते. परंतु, जालना सारख्या निमशहरी परिसरात ही संकल्पना यशस्वी होईल की नाही याबाबत साशंकता असलेल्या नंदापूरच्या ज्ञानेश्वर उबाळे यांनी योग्य नियोजन, मेहनत आणि कल्पकतेच्या जोरावर कृषी पर्यटनाच्या व्यवसायात जम बसवला आहे.
advertisement
12 जानेवारी 2024 मध्ये उबाळे यांनी नंदापूर गावात या 2 एकरात पर्यटन केंद्राची सुरुवात केली. अल्पावधीतच वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध केल्या. त्यांच्या बोटींग, झीप रायडींग, स्काय सायकल, उंट सफारी, घोडी सफारी, ट्रेन सफारी, मॅजिक शो, स्विमिंग पूल, रेन डान्स इत्यादी प्रकारचे खेळ तर खाद्य महोत्सवात मराठवाडा स्पेशल हुरडा पार्टी, थालीपीठ, दहीधपाटे, मिसळ पाव, गावरान मेव्यात बोरं, पपई, मोसंबी, पेरू, मका इत्यादी रानमेवा उपलब्ध आहे. त्याचबरोबर आहारावर भाजलेल्या डाळ बाटी जेवणात दिली जाते.
advertisement
या व्यवसायात सुरुवातीला असंख्य अडचणी आल्या. सुरू करण्याआधी आम्ही पुणे भागात जाऊन आलो. अडचणींवर मात करत हे कृषी पर्यटन केंद्र सुरू झाले. सध्या शालेय सहल आणि फॅमिली ट्रिपसाठी सर्वाधिक लोक येत आहेत. लोकांच्या सेवेत 12 पुरुष आणि 8 महिला अशी एकूण 20 लोकांची टीम असल्याचे उबाळे यांनी सांगितले.
view commentsLocation :
Jalna,Maharashtra
First Published :
Dec 19, 2025 3:58 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Success Story : 2 एकरात उभारला कृषी पर्यटन व्यवसाय, तरुणाची वर्षाला 25 लाखांची कमाई, 20 जणांना दिला रोजगार, Video










