शेतात हे झाडे लावा! अन् मुलीच्या शिक्षण, लग्नासाठी सरकारकडून २० लाख रु मिळवा, अर्ज कुठे कराल?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Chandan Kanya Yojana : केंद्र आणि राज्य सरकारांकडून मुलींच्या शिक्षण, आरोग्य आणि सक्षमीकरणासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत.
मुंबई : केंद्र आणि राज्य सरकारांकडून मुलींच्या शिक्षण, आरोग्य आणि सक्षमीकरणासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. मध्य प्रदेश सरकारची लाडली लक्ष्मी योजना असो वा महाराष्ट्र सरकारची सुकन्या समृद्धी योजना, या योजनांनी अनेक कुटुंबांना दिलासा दिला आहे. मात्र आता शेतकऱ्यांनीच शेतकऱ्यांच्या मुलींसाठी सुरू केलेली एक अनोखी आणि दीर्घकालीन फायदे देणारी योजना चर्चेत आली आहे. “चंदनकन्या योजना” असे या उपक्रमाचे नाव असून, महाराष्ट्र चंदन उत्पादक संघ यांनी या योजनेसाठी पुढाकार घेतला आहे.
शेतकऱ्यांच्या मुलींसाठी वेगळी वाट
सुरुवातीला ही योजना केवळ संघाच्या सभासद शेतकऱ्यांसाठी मर्यादित होती. मात्र वाढता प्रतिसाद आणि योजनेचा सामाजिक व आर्थिक लाभ लक्षात घेऊन आता ही योजना महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या मुलींसाठी खुली करण्यात आली आहे. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे सरकारी अनुदानावर अवलंबून न राहता शेतीतील नैसर्गिक संसाधनांचा वापर करून भविष्यात मोठा आर्थिक आधार उभा करणे.
advertisement
काय आहेत चंदनकन्या योजनेचे फायदे?
या योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्याला सर्व प्रकारची मदत नि:शुल्क दिली जाणार आहे. मुलीच्या नावाने लागवडीसाठी २० चंदनाची रोपे जिल्हा स्तरावर उपलब्ध करून दिली जाते. चंदन लागवड कशी करावी, कोणत्या जमिनीत योग्य ठरेल, पाणी व खत व्यवस्थापन कसे असावे याचे सविस्तर मार्गदर्शन संघाकडून केले जाईल.
लागवडीनंतर एक वर्षाने चंदनाच्या झाडांची नोंद महसूल कागदपत्रांमध्ये करून घेण्यासाठीही मदत केली जाणार जाते. पुढे झाडे परिपक्व झाल्यानंतर त्यांची तोड, वाहतूक परवाना काढणे आणि विक्री प्रक्रियेत मार्गदर्शन अशी सर्व कामे संघ स्वतः पाहणार पाहते.
advertisement
अशी आहे “चंदनकन्या” योजनेची रचना
१ ते १० वर्षे वयोगटातील मुलगी असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेताच्या बांधावर किंवा मोकळ्या जागेत फक्त २० चंदनाची झाडे लावायची आहेत. ही झाडे सुमारे १२ वर्षे सांभाळली तर त्या कालावधीनंतर त्यातून मोठे आर्थिक उत्पन्न मिळू शकते. अंदाजे १२ वर्षांनंतर या २० चंदनाच्या झाडांमधून १५ ते २० लाख रुपयांपर्यंत रक्कम मिळण्याची शक्यता असते. ही रक्कम मुलीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी मोठा आधार ठरू शकते.
advertisement
नोंदणी प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे
या योजनेत सहभागी होण्यासाठी मुलीचे तसेच वडिलांचे आधार कार्ड आवश्यक आहे. अर्जासोबत ११०० रुपये इतके सहभाग शुल्क भरून नोंदणी करता येते. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपले नाव तसेच मुलगी, पुतणी, भाची किंवा नातीचे पूर्ण नाव ७०३८४४३३३३ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवावे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 01, 2026 9:06 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
शेतात हे झाडे लावा! अन् मुलीच्या शिक्षण, लग्नासाठी सरकारकडून २० लाख रु मिळवा, अर्ज कुठे कराल?








