जालना बाजारात नवी तूर दाखल, कोणत्या वाणाला मिळालाय उच्चांकी दर?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
नारायण काळे, प्रतिनिधी
जालना: सोयाबीन कापूस यानंतर तूर हे राज्यातील खरीप हंगामातील एक प्रमुख पीक आहे. डाळवर्गीय पीक असल्याने तुरीला बाजारात नेहमीच मागणी असते. सध्या बहुतांश भागातील तूर ही शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये आहे. मात्र कोरडवाहू व लवकर येणाऱ्या तुरीच्या वाणाची सोंगणी देखील सुरू झालेली आहे. नवीन तूर जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल झाली आहे. नवीन बाजारात दाखल झालेल्या तुरीला चांगला दर मिळाला असून यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय.
advertisement
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मंगरूळ गावच्या जिजा आबासाहेब शिंदे या शेतकऱ्याने पंचगंगा या वाणाची 9 गोण्या तूर विक्रीसाठी आणली होती. या तुरीला जालना शहरातील नव्या मोंड्यात 9 हजार 211 रुपये एवढा दर मिळाला. शिंदे यांनी एक एकर क्षेत्रावर पंचगंगा वाणाची तूर लावली होती. त्यांना एकरी 10 क्विंटलच्या आसपास उत्पन्न मिळालं. त्यापैकी त्यांनी केवळ 9 गोण्या विक्रीसाठी आणल्या होत्या.
advertisement
फक्त खर्च निघाला
तुरीवर होत असलेला कीड रोगांचा प्रादुर्भाव, महाग झालेली खते आणि औषधांच्या किमती यामुळे या भावात तूर पिक घेणे परवडत नाही. या महागाईच्या काळात या दरात गाडीभाडं आणि इतर खर्च असा विचार केला तर फक्त खर्च निघतोय. सध्या तुरीला किमान 12 हजार रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळावा अशी अपेक्षा शेतकरी जिजा शिंदे यांनी व्यक्त केली.
advertisement
पाढंऱ्या तुरीला अधिक दर
दरम्यान, जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीची आवक नुकतीच सुरू झाली आहे. आगामी काळात आवक मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुरीचे दर दबावत येऊ शकतात. सध्या केवळ लाल रंगाची तुर बाजारात दाखल झाली असून पांढऱ्या रंगाची तूर बाजारात येण्यासाठी आणखी अवधी आहे. लाल रंगाच्या तुरीपेक्षा पांढऱ्या तुरीला अधिकचा दर मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितलं.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
December 01, 2024 2:44 PM IST