Social Media : लाइक, शेअर, कमेंट न करतानाही ती पोस्ट पाहिली हे सोशल मीडियाला कसं कळतं?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Social Media Facts : मी काहीच केलं नाही, तरी सोशल मीडियाला कसं कळलं की मला ही पोस्ट आवडली? याचं उत्तर आहे युझर बिहेव्हियर ट्रॅकिंग. आजचं सोशल मीडिया फक्त लाइक्सवर चालत नाही, तर आपण काय पाहतो, कसं पाहतो आणि किती वेळ पाहतो यावर चालतं.
आपण अनेकदा इन्स्टाग्राम, फेसबुक किंवा इतर सोशल मीडिया वापरताना पोस्ट पाहतो, पण लाइक करत नाही, शेअर करत नाही, कमेंटही करत नाही. तरीसुद्धा काही वेळाने तशाच प्रकारच्या पोस्ट्स पुन्हा पुन्हा दिसायला लागतात. तेव्हा मनात प्रश्न येतो, मी काहीच केलं नाही, तरी सोशल मीडियाला कसं कळलं की मला ही पोस्ट आवडली? याचं उत्तर आहे युझर बिहेव्हियर ट्रॅकिंग.
advertisement
व्ह्यू टाइम सगळ्यात महत्त्वाचा सिग्नल. अल्गोरिदमसाठी सर्वात मोठा इशारा म्हणजे तुम्ही पोस्ट किती वेळ पाहिली. रिल पूर्ण पाहिली का? व्हिडीओ अर्धवट थांबवून पाहिला का? इमेजवर काही सेकंद थांबलात का? जर तुम्ही एखादी पोस्ट 2–3 सेकंदांपेक्षा जास्त वेळ पाहिली, तर अल्गोरिदमला समजतं की या युझरला हे कटेंट इंटरेस्टिंग वाटतंय.
advertisement
advertisement
advertisement
पोस्ट पाहिल्यानंतर तुम्ही ते प्रोफाइल उघडलं, त्याच्या इतर पोस्ट्स पाहिल्या की हे अल्गोरिदमला स्पष्ट सांगत की तुम्ही यात इंटरेस्टेड आहात. तुम्ही एखादा विषय सर्च केला, त्याच टॉपिकवर पोस्ट पाहिली तर अल्गोरिदम हे दोन्ही जोडतो. उदा. तुम्ही होम वर्कआऊट सर्च केलं आणि वर्कआऊट रिल थांबून पाहिली की पुढे फिटनेस कंटेट वाढतो.
advertisement
advertisement










