2000 पेक्षा जास्त प्रवासी अन् रात्री 1.30 वेळ, अचानक ट्रेनच्या दोन कोचनं घेतला पेट, एकाचा होरपळून मृत्यू, PHOTO

Last Updated:
अनाकापल्लीतील टाटानेगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसला मध्यरात्री आग लागून B1 आणि M2 कोच जळाले, १ प्रवासी मृत्युमुखी; शेकडो प्रवासी प्रसंगावधानाने बचावले.
1/7
मध्यरात्रीची वेळ... शांतपणे झोपलेले शेकडो प्रवासी... आणि अचानक काळाने घातलेला घाला! आंध्र प्रदेशातील अनाकापल्ली जिल्ह्यात टाटानेगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसला मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत दोन एसी डबे भस्मसात झाले असून, या घटनेत एका प्रवाशाचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

advertisement
2/7
आंध्रमधून काळजाचा ठोका चुकवणारी बातमी! धावत्या एक्स्प्रेसचे २ एसी कोच पेटले; १ प्रवाशाचा होरपळून मृत्यू, शेकडो थोडक्यात वाचले. या घटनेमुळे स्टेशनवर भीतीचं वातावरण पसरलं होतं.

3/7
रात्री उशिरा 12.45 ते दीडच्या सुमारास ट्रेन एला मंचिली रेल्वे स्थानकाजवळ पोहोचली असताना अचानक B1 कोचमधून आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या. पाहता पाहता ही आग M2  कोचपर्यंत पसरली. गाढ झोपेत असलेल्या प्रवाशांना काही समजायच्या आत डब्यात धुराचे लोळ वाढले.

4/7
आगीच्या ज्वाळा पाहून प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली. जिवाच्या आकांतात प्रवाशांनी आपत्कालीन साखळी ओढली आणि धावत्या ट्रेनमधून बाहेर पडण्यासाठी धडपड सुरू केली. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या दोन डब्यांना आग लागली, त्यातील एका डब्यात ८२ तर दुसऱ्या डब्यात ७६ प्रवासी प्रवास करत होते.

5/7
आग लागल्यानंतर प्रवाशांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली आणि शेकडो जीव वाचले. मात्र, आग आटोक्यात आल्यानंतर 'B1' कोचमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. काळाने या प्रवाशावर घाला घातला आणि त्याच्या प्रवासाचा शेवट अशा भीषण पद्धतीने झाला.

6/7
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सुदैवाने अनेक प्रवासी वाचले असले, तरी अनेकांचे संसाररुपी साहित्य, कपडे आणि मौल्यवान वस्तू या आगीत जळून खाक झाल्या आहेत. अनेक प्रवाशांनी आपले डोळ्यादेखत आपले सामान जळताना पाहिले.

7/7
या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अंगावर काटा आणणारे या घटनेचे फोटो समोर आले हेत. या ट्रेनमध्ये 2000 हून अधिक प्रवासी होत. सुदैवानं कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही. हे फोटो अंगावर काटा आणणारे आहेत.

Shiv Sena Candidate List BMC Election: बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
  • भाजपसोबत जागा वाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना मोठा निर्णय घ

  • शिंदे यांनी आपल्या ६० उमेदवारांना तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.

  • एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे.

View All
advertisement