advertisement

Pipeline Subsidy 2025 : राज्य सरकार शेतकऱ्यांना देणार पाईपलाइन,योजनेसाठी अर्ज कुठे आणि कसा कराल? वाचा सविस्तर

Last Updated:

Agriculture News : राज्य सरकार सातत्याने विविध योजना राबवून शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवत असते. अशाच एका महत्त्वपूर्ण योजनेअंतर्गत, राज्य सरकार शेतकऱ्यांना मोफत पाईपलाइनसाठी अनुदान देणार आहे. मग आता ही योजना काय आहे? लाभ कसा घ्यायचा? हेच आपण जाणून घेणार आहोत.

News18
News18
मुंबई : राज्यातील शेतकरी हे आपल्या अर्थव्यवस्थेचे कर्ताधर्ता असून त्यांच्या समृद्धीवरच प्रजाजनांचे सुख-समाधान अवलंबून आहे. हवामानातील बदल, आर्थिक आव्हाने, आणि नैसर्गिक आपत्ती यांचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. यामुळेच राज्य सरकार सातत्याने विविध योजना राबवून शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवत असते. अशाच एका महत्त्वपूर्ण योजनेअंतर्गत, राज्य सरकार शेतकऱ्यांना मोफत पाईपलाइनसाठी अनुदान देणार आहे. मग आता ही योजना काय आहे? लाभ कसा घ्यायचा? हेच आपण जाणून घेणार आहोत.
पाईपलाइन अनुदान योजना काय आहे?
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत (NFSM) राज्य शासनाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सिंचनासाठी पाईप खरेदीवर 50% अनुदान देण्याची घोषणा केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना 28 जानेवारी 2025 पर्यंत महाडीबीटी (Mahadbt) पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे.
योजनेची वैशिष्ट्ये आणि लाभ
शेतीतील सिंचन व्यवस्था सुधारण्यासाठी ही योजना फार उपयुक्त ठरणार आहे. योजनेअंतर्गत खालील प्रकारच्या पाईप्सवर अनुदान दिले जाणार आहे:
advertisement
एचडीपीई पाईप (HDPE)- प्रति मीटर 50 रु अनुदान
पीव्हीसी पाईप (PVC) - प्रति मीटर 35 रु अनुदान
एचडीपीई लाईन विनाईल फॅक्टर - प्रति मीटर 20 रु अनुदान
आवश्यक कागदपत्रे कोणती?
सातबारा उतारा (अद्ययावत)
आधार कार्ड
बँक पासबुक (अर्जदाराच्या नावावर असणे गरजेचे)
रहिवासी दाखला
पाणीपुरवठ्याचा पुरावा (आवश्यक असल्यास)
पात्रता निकष काय आहेत?
अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
advertisement
अर्जदाराच्या नावावर शेतजमीन असणे आवश्यक.
शासनाने निर्धारित केलेल्या इतर पात्रता निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे.
अर्ज कसा करावा?
सर्वप्रथम तुम्हाला mahadbtmahait.gov.in या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल. नवीन युजर असल्यास रजिस्ट्रेशन करा किंवा असलेल्या अकाउंटवर लॉगिन करा. नंतर NFSM अंतर्गत पाईप अनुदान योजना निवडा. त्यात आवश्यक माहिती भरा आणि कागदपत्रे अपलोड करा. आणि फॉर्म सबमिट करा त्याची प्रिंट काढून ठेवा.
advertisement
विशेष सूचना 
तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी लवकर अर्ज करा.
सर्व कागदपत्रे आधीच स्कॅन करून ठेवा.
अर्जाची प्रिंट काढून ठेवा आणि संदर्भ क्रमांक सुरक्षित ठेवा.
अर्जाची स्थिती वेळोवेळी तपासणे आवश्यक आहे.
दरम्यान, राज्य सरकारने सर्व पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. आधुनिक सिंचन पद्धतींचा अवलंब करून शेती उत्पादन वाढवण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Pipeline Subsidy 2025 : राज्य सरकार शेतकऱ्यांना देणार पाईपलाइन,योजनेसाठी अर्ज कुठे आणि कसा कराल? वाचा सविस्तर
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement