तब्बल एक महिना आधीच मृग बहाराची मोसंबी बाजारात, पाहा काय मिळतोय दर
- Reported by:Kale Narayan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
सामान्यतः 1 जानेवारीपासून मृग बहाराची मोसंबी बाजारात येण्यास सुरुवात होते. मात्र यावर्षी तब्बल एक महिना आधीच मृग बहाराची मोसंबी बाजारात दाखल झाली आहे.
नारायण काळे, प्रतिनिधी
जालना : जालना कृषी उत्पन्न बाजार समितीतील मोसंबी मार्केटमध्ये मृग बहाराची नवीन मोसंबी बाजारात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. सामान्यतः 1 जानेवारीपासून मृग बहाराची मोसंबी बाजारात येण्यास सुरुवात होते. मात्र यावर्षी तब्बल एक महिना आधीच मृग बहाराची मोसंबी बाजारात दाखल झाली आहे. जालना शहरातील मोसंबी बाजारात दररोज 80 ते 100 टन मोसंबीची आवक होत आहे. उत्तर भारतात गारठा वाढल्याने मोसंबीला फारशी मागणी नाही. त्यातच मोसंबीमध्ये पाण्याचे प्रमाण देखील कमी आहे. त्यामुळे मोसंबीला उठाव नसल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. पाहुयात जालना कृषी उत्पन्न बाजार समितीतील मोसंबी बाजारात मृग बहाराच्या नवीन मोसंबीला काय दर मिळतोय आणि आगामी काळात मोसंबी दराची स्थिती कशी असेल.
advertisement
सध्या मोसंबी मार्केटमध्ये मृग बहाराच्या मोसंबीची आवक 100 टनापर्यंत येत आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा महिनाभर आधीच आवक येण्यास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनी 15 डिसेंबर किंवा 1 जानेवारीनंतर मोसंबीची तोडणी केल्यास चांगला दर मिळू शकतो. सध्या मृग बहाराची मोसंबी 12 हजार रुपये प्रति टन पासून 17 ते 18 हजार रुपये प्रति टन पर्यंत विक्री होत आहे. शेतकऱ्यांनी मोसंबी तोडणीची घाई केली नाही तर निश्चितच मोसंबीचे दर आणखी वाढतील. 15 फेब्रुवारी नंतर मोसंबीची विक्री केल्यास शेतकऱ्यांना 25 हजार रुपये प्रति टन पर्यंत दर मोसंबीला मिळू शकतो, अशी शक्यता व्यापारी अंबर पाटील यांनी व्यक्त केली.
advertisement
जालना जिल्ह्यातील मालीपिंपळगाव येथील शेतकरी मधुकर पिचुरे यांनी 15 क्विंटल मोसंबी विक्रीसाठी बाजार समितीमध्ये आणली होती. सध्या मोसंबीला 17 ते 18 हजार रुपये प्रति टन असा दर मिळत आहे. या भावामध्ये आम्हाला काहीही परवडत नाही. मोसंबीला किमान 30 ते 35 हजार रुपये प्रति टन असा दर मिळाला हवा. मोसंबी पिकाला खूप खर्च करावा लागतो खत आणि फवारण्या घ्याव्या लागतात. मोसंबीची तोड करण्यासाठी देखील मजुरांचा मोठा खर्च येतो. त्यामुळे दरात वाढ होण्याची अपेक्षा पिचुरे यांनी व्यक्त केली.
advertisement
दरम्यान, जालना शहरातील मोसंबी बाजारात मृग बहाराबरोबरच आंबिया बहाराची मोसंबी देखील विक्रीसाठी येत आहे. आंब्या बहराच्या मोसंबीला 36 हजार रुपये प्रति टन असा दर मिळत आहे. मात्र आंब्या बहाराची मोसंबीची आवक अत्यल्प असून संपूर्ण बाजारात केवळ आठ ते दहा टन आवक दररोज होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितलं. जालना बाजारातील मोसंबी उत्तर भारतातील कानपूर, लखनऊ, दिल्ली, जयपूर, आग्रा या शहरांमध्ये विक्रीस पाठवली जाते.
view commentsLocation :
Jalna,Maharashtra
First Published :
Dec 04, 2024 7:37 PM IST









