advertisement

सोयबीनच्या दरात पुन्हा सुधारणा! शेतकऱ्यांना दिलासा, सध्याचे मार्केट काय?

Last Updated:

Soyabean Market Update : राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरांमध्ये सध्या संमिश्र चित्र पाहायला मिळत आहे.

soyabean market update
soyabean market update
मुंबई : राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरांमध्ये सध्या संमिश्र चित्र पाहायला मिळत आहे. काही बाजारांमध्ये दर स्थिर असून काही ठिकाणी चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला समाधानकारक भाव मिळत आहे. १४ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या बाजार आकडेवारीनुसार राज्यातील सोयाबीनचे दर किमान ४,००० रुपये तर कमाल ५,७०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.
अहिल्यानगर, लातूर आणि जालना बाजारात मोठी आवक
अहिल्यानगर बाजार समितीत सोयाबीनची २७२ क्विंटल आवक नोंदवण्यात आली. येथे किमान दर ५,००० रुपये, कमाल ५,३०० रुपये तर सरासरी दर ५,१५० रुपये राहिला. लातूर बाजारात सर्वाधिक म्हणजे तब्बल ८,००० क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून पिवळ्या सोयाबीनला ४,९४३ ते ५,३२७ रुपये दर मिळाला. जालना बाजारातही मोठी आवक दिसून आली असून येथे उच्च प्रतीच्या सोयाबीनला थेट ५,७०० रुपयांचा कमाल दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
advertisement
विदर्भात संमिश्र दर, गुणवत्तेला मागणी
विदर्भातील अकोला, अमरावती आणि नागपूर बाजारांमध्ये सोयाबीनच्या दरांमध्ये संमिश्रता पाहायला मिळाली. अकोल्यात १,७१२ क्विंटल आवक झाली असून येथे सरासरी दर ५,३८० रुपये नोंदवण्यात आला. अमरावतीत लोकल सोयाबीनला ४,८०० ते ५,२५१ रुपये दर मिळाला, तर नागपूरमध्ये सरासरी ५,२१२ रुपये दर मिळाल्याची माहिती बाजार सूत्रांनी दिली.
पश्चिम महाराष्ट्रात दर स्थिर, आवक मर्यादित
पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, पाचोरा आणि कोपरगाव बाजारांत आवक तुलनेने कमी असली तरी दर स्थिर राहिले. सोलापूर बाजारात लोकल सोयाबीनला ५,३३० ते ५,३७० रुपये असा चांगला भाव मिळाला. पाचोर्‍यात सरासरी दर ४,८०० रुपये तर कोपरगावात ५,२५० रुपये दर नोंदवण्यात आला.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
सोयबीनच्या दरात पुन्हा सुधारणा! शेतकऱ्यांना दिलासा, सध्याचे मार्केट काय?
Next Article
advertisement
मुंबई-नाशिक मार्गावर 131 KMचा नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट; मोदी सरकारचा मेगा प्लान
मुंबई-नाशिक मार्गावर नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट
  • महाराष्ट्रासाठी मोदी सरकारची मोठी भेट

  • प्रवासाचा वेग वाढणार आणि खर्च कमी होणार

  • थेट ज्योतिर्लिंगापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार

View All
advertisement