advertisement

Paaru Serial : 'पारू' झाली 'गायब'! मालिका अचानक बंद होण्याचं कारण समोर

Last Updated:
Marathi Serial Paaru : पारू मालिकेचा एपिसोड 10 फेब्रुवारीनंतर दाखवण्यात आला नाही. मालिकेचा शेवटही झालेला नाही. मग मालिका अशी मधेच बंद का झाली? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. त्याचं कारण आता समोर आलं आहे.
1/7
झी मराठी चॅनेलवरील प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेपैकी एक पारू. या मालिकेत शरयू सोनावणे आणि प्रसाद जवादे मुख्य भूमिकेत आहेत. तर मुग्धा कर्णिकने अहिल्यादेवी हे पात्र साकारलं आहे. श्वेता शिंदे खलनायिकेच्या भूमिकेत आहे. ही मालिका 12 फेब्रुवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेने जवळपास दोन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. ही मालिका आता अचानक बंद झाली आहे.

2/7
10 फेब्रुवारीनंतर या मालिकेचा एकही एपिसोड ऑन एअर झालेला नाहीये. Zee 5 वर सुद्धा 10 फेब्रुवारीनंतरचे भाग उपलब्ध नाहीत. मालिकेचा शेवटही झालेला नाही. शेवटचा एपिसोड नाही, शेवटच्या दिवशी कलाकारांनी केलेल्या कोणत्याही सेलिब्रेशनचे फोटो किंवा व्हिडीओ देखील समोर आलेले नाहीत. त्यामुळे अचानक असं काय झालं, की मालिका बंद झाली, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

3/7
मालिकेची मुख्य अभिनेत्री शरयू सोनावणेने काही फॅनपेजेसच्या इन्स्टाग्राम पोस्ट रिशेअर केल्या आहेत. ज्यात
मालिकेची मुख्य अभिनेत्री शरयू सोनावणेने काही फॅनपेजेसच्या इन्स्टाग्राम पोस्ट रिशेअर केल्या आहेत. ज्यात "आता यापुढे पारू आपल्याला दिसणार नाहीये खूप भरून आलंय", "थँक्यू प्रसाद दादा आणि शरयू ताई तुमच्या मालिकेतील भूमिका आमच्या कायम लक्षात राहतील" असे मेसेज लिहिण्यात आलेत.
advertisement
4/7
यानंतर मराठी सीरिअल्स ऑफिशिअल या इन्स्टाग्राम अकाऊंटवर याबाबतची पोस्ट करण्यात आली आहे. ज्यात झी मराठीवरील पारू मालिका अपरिहार्य कारणांमुळे आणि आव्हानांमुळे काही काळ विश्रांती घेत असल्याचं सांगण्यात आलं आहे.

5/7
टीआरपी नसल्याने किंवा आर्थिक नुकसान झाल्याने मालिका गुंडाळली जाणे, हे आजवर अनेकदा झालं आहे. पण रात्री उशिराच्या स्लॉटलासुद्धा या मालिकेला चांगला टीआरपी मिळत होता. त्यामुळे पारू मालिका का संपली याबद्दल सर्वांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत.

6/7
यामागे टीआरपीची गणितं नसून कलाकार आणि तंत्रज्ञांचं मानधन थकबाकी हे कारण असल्याचा अंदाज बांधला जातो आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी ऑक्टोबर, नोव्हेंबरपासून कलाकार आणि तंत्रज्ञांना मानधन मिळालं नव्हतं. याबाबत निर्मात्यांनी कोणतेही ठोस पाऊल उचललं नाही. त्यामुळे मालिकेचा गाशा गुंडाळण्याची वेळ आल्याचं सांगण्यात येतं.

7/7
मराठी सीरिअल्स ऑफिशिअल या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दिलेल्या माहितीनुसार या मालिकेचा लवकरच निरोपाचा शेवटचा आठवडा प्रसारित केला जाईल आणि याची वेळ लवकरच कळवली जाईल, असं म्हटलं आहे. या मालिकेचा शेवटचा भाग त्याच वाहिनीच्या दुसऱ्या एका लोकप्रिय मालिकेसोबत महासंगम करत प्रसारित केला जाणार असल्याचं समजतं आहे.

युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement