मिठी मारून पाठीवरून हात...! मराठी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतसोबत सेटवर घाणेरडं कृत्य; अभिनेत्याने नको ते केलं
- Published by:Priya Lad
Last Updated:
Sharmishtha Raut : प्रसिद्ध मराठी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतसोबत एका अभिनेत्याने नको तेच कृत्य केलं. तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याचा खुलासा केला आहे.
मनोरंजन विश्व जितकं चमकणार तितकीच त्याची दुसरी बाजू अंधाराने माखलेली आहे. इंडस्ट्रीमध्ये अनेक अभिनेत्रींनी वाईट अनुभव आले आहेत. बहुतेक वेळा हिंदी इंडस्ट्रीत असे प्रकार समोर आले आहेत. त्याबद्दल अनेक अभिनेत्री व्यक्तही झाल्या आहेत. मराठी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतसोबतही असा घाणेरडा प्रकार घडला आहे. तिला आलेला तो वाईट अनुभव तिने एका मुलाखतीत सांगितला आहे.
advertisement
शर्मिष्ठाने नुकतीच मुलाखत दिली. तिने सांगितलं की, "इंडस्ट्रीत पदार्पण केल्या केल्या मी एक शो केला. मी त्या कार्यक्रमाचं आणि निर्मात्यांचं नाव घेणार नाही कारण ते खूप चांगले आहेत. तिकडे एक अभिनेते होते. ते ज्या पद्धतीने मी सेटवर आल्यावर मला ग्रीट करायचे, मला समोरून मिठी मारायचे, पाठीवरून एक विचित्र हात फिरवायचे. तेव्हा मला त्यांचा स्पर्श कळायचा, मला कळायचं की, हा स्पर्श चुकीचा आहे"
advertisement
advertisement
"हे दोन-तीनदा झालं त्या सेटवर तसंच. मग मी एक दिवशी ठरवलं की मी बोलणार. जास्तीत जास्त काय होईल मी इंडस्ट्रीतून बाहेर होईन. आउट झाले तरी माझ्याकडे डिग्री आहे. मी पंधरा ते वीस हजाराची नोकरी मिळवू शकते. त्यानंतर पुन्हा एकदा ते सेटवर मला मिठी मारायला आले 'अरे हाय म्हणून. तेव्हा मी त्यांना म्हटलं 'सर मी घातलीय. तर त्यांना कळलं नाही मी काय बोलतेय. तेव्हा मी त्यांना म्हटलं 'सर चेक करू नका मी माझे अंतर्वस्त्र घातलेले आहेत."
advertisement
"इतकं धडधडीत मी 70 लोकांसमोर सेटवर बोलले. त्यानंतर त्यांनी पुन्हा असं कधीच केलं नाही. मी आले की ते समोरही यायचे नाहीत किंवा साईडला जायचे. ही गोष्ट मी कधी घरीही सांगितली नाही कारण मला कळायचं नाही सांगू की नको. पण मी बाहेर बोलून मोकळी झाले होते", असं तिन 'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.










