मोसंबीच्या आंबिया बहाराची तयारी करताना होतात चुका, मग योग्य पद्धतीने करा असं नियोजन, कृषी तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

Last Updated:

सध्या मोसंबी उत्पादक शेतकरी आंबिया बहाराची तयारी करत आहेत. आंबिया बहाराच नियोजन करत असताना अनेकदा शेतकऱ्यांकडून चुका होत असतात.

+
News18

News18

नारायण काळे, प्रतिनिधी 
जालना : मराठवाड्यामध्ये जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी या जिल्ह्यांमध्ये मोसंबीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असल्याचे पाहायला मिळतं. सध्या मोसंबी उत्पादक शेतकरी आंबिया बहाराची तयारी करत आहेत. आंबिया बहाराच नियोजन करत असताना अनेकदा शेतकऱ्यांकडून चुका होत असतात. या चुका टाळून शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करून आंबिया बहाराची उत्पादकता कशी वाढवावी याबाबत लोकल 18 च्या प्रतिनिधीने बदनापूर येथील मोसंबी संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ डॉक्टर संजय पाटील यांच्याशी संवाद साधला पाहुयात.
advertisement
मराठवाडा हा मोसंबी पिकासाठी ओळखला जातो. प्रामुख्याने मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मोसंबी पिकाची लागवड आहे. सद्यस्थितीमध्ये आंबिया बहारासाठी शेतकऱ्यांनी मोसंबी बागा तानावर सोडलेल्या आहेत. या बागेची व्यवस्थापन करत असताना या बागेमध्ये शेतकऱ्यांनी सर्वप्रथम या बागेला विश्रांती दिली पाहिजे, असं संजय पाटील यांनी सांगितलं.
advertisement
झाडांना कृत्रिम विश्रांती का द्यावी?
उष्ण आणि समशीतोष्ण भागामध्ये या झाडाला सातत्याने फुल येत असतात. वर्षभर फुलं हे योग्य नाही. त्यामुळे झाड कमकुवत बनतात. झाडांना एका बहरात भरपूर फुल आली तर दुसऱ्या बहरात कमी फुले येतात, झाडे अशक्त बनतात, झाडाची रोगप्रतिकार क्षमता कमी होते. रोगकिडीचा प्रादुर्भाव वाढतो आणि या सर्व कारणांमुळे मोसंबीची उत्पादकता कमी होते. हे जर टाळायचं असेल तर एकच बहार घेणं अत्यंत आवश्यक असतं आणि यासाठी झाडांना कृत्रिमरीत्या ताण देणे गरजेचे असतं.
advertisement
मोसंबी झाडाला ताण देत असताना हा जमिनीच्या प्रतीनुसार विविध दिवसांचा असतो. आपली जमीन हलकी असेल तर 45 ते 55 दिवसाचा तान पुरेसा ठरतो. जमीन मध्यम असेल तर 55 ते 60 दिवसाचा ताण द्यावा आणि जमीन जर भारी असेल अशा जमिनीमध्ये 65 ते 75 दिवसांचा तानाचा कालावधी मोसंबी पिकाला अतिशय महत्त्वाचा आहे. ताण देण्यापूर्वी झाडांना आपण जी विश्रांती देतो ती देत असताना, आपण जे पाणी देतो हे पाणी हळूहळू कमी करत जाणं आणि तान सोडताना पाणी हळूहळू वाढवत जाणं गरजेचं  असल्याचं बदनापूर येथील मोसंबी संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ डॉक्टर संजय पाटील यांनी सांगितलं.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
मोसंबीच्या आंबिया बहाराची तयारी करताना होतात चुका, मग योग्य पद्धतीने करा असं नियोजन, कृषी तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला
Next Article
advertisement
Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement