विशेष म्हणजे, ७ नोव्हेंबर रोजी सोयाबीनला मिळालेला ६,५११ रुपयांचा दर हा आठवड्यातील सर्वाधिक होता. तर ८ नोव्हेंबर रोजी मिळालेला ३,००० रुपयांचा दर सर्वात कमी राहिला. दररोजच्या आवकेत ११,५३० ते १७,३८४ क्विंटलपर्यंत फरक आढळून आला. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सोयाबीनच्या गुणवत्तेनुसार भावात मोठी तफावत दिसून आली.
बाजरीच्या दरात चढ-उतार
गेल्या आठवड्यात बाजरीची एकूण २,९६८ क्विंटल आवक झाली. दिवसागणिक ३९५ ते ७४९ क्विंटल अशी आवक नोंदली गेली. भावातही चढ-उतार दिसून आला. बाजरीला किमान २,००० रुपये तर कमाल ३,१०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. सरासरी भाव २,७७५ ते ३,०२५ रुपयांच्या दरम्यान राहिला. व्यापाऱ्यांच्या मते, बाजारात दर्जेदार बाजरीचे प्रमाण कमी असल्याने भावात अस्थिरता कायम आहे.
advertisement
हरभऱ्याची आवक मर्यादित
हरभरा पेरणीच्या दिवसांमुळे बाजारात त्याची आवक कमी झाली. फक्त ३८७ क्विंटल हरभरा विक्रीसाठी आला. दररोज ५० ते ११९ क्विंटल अशी अल्प आवक झाली. हरभऱ्याला ४,५०० ते ५,०७५ रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. शेतकरी संघटनांच्या मते, नवीन पिक येण्यास अजून वेळ असल्याने दरात स्थैर्य दिसत आहे.
मका बाजारात स्थिरता
मक्याची एकूण आवक ११,१९६ क्विंटल इतकी झाली. दररोज १,५६३ ते ३,६१४ क्विंटल अशी आवक नोंदवली गेली. मक्याला सरासरी १,४५० ते १,५५० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. या कालावधीत मक्याचे किमान दर ९५० रुपये तर कमाल दर १,८०० रुपये प्रतिक्विंटल इतके राहिले. व्यापाऱ्यांच्या मते, सध्या बाजारात मागणी स्थिर असून दरात फारसा बदल नाही.
पांढऱ्या तुरीची आवक वाढली
पांढऱ्या तुरीची एकूण १,०३२ क्विंटल आवक झाली. दररोज १०५ ते ३०४ क्विंटलपर्यंत तुरी बाजारात आली. तुरीला सरासरी ६,५०० ते ६,८०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. सध्या तुरीचे दर चांगले असून, नवीन तुर बाजारात आल्यानंतर दरात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
