कापूस आणि सोयाबीन दरात पुन्हा वाढ, तुरीला काय मिळाला भाव? एका क्लिकवर चेक करा

Last Updated:

वर्षाच्या अखेरच्या दिवशी देखील राज्यातील कृषी बाजारात संमिश्र चित्र पाहायला मिळत आहे. काही प्रमुख पिकांच्या दरात किंचित वाढ नोंदवली गेली असून काही पिकांचे भाव स्थिर असल्याचं चित्र आहे.

+
News18

News18

अमरावती : वर्षाच्या अखेरच्या दिवशी देखील राज्यातील कृषी बाजारात संमिश्र चित्र पाहायला मिळत आहे. काही प्रमुख पिकांच्या दरात किंचित वाढ नोंदवली गेली असून काही पिकांचे भाव स्थिर असल्याचं चित्र आहे. कपाशी, सोयाबीन आणि तुरीच्या दरात वाढ दिसून येत असताना कांद्याचे दर मात्र स्थिर राहिले आहेत. तसेच आवक देखील कमी अधिक झाली आहे. आज 31 डिसेंबर रोजी सोयाबीन, कांदा, कापूस आणि तुरीला भाव किती मिळाला पाहुयात.
कपाशीच्या दरात किंचित वाढ
कृषी मार्केटमधील वेबसाईटवरील सायंकाळी 6.30 वाजताच्या रिपोर्टनुसार, आज राज्याच्या कृषी बाजारात एकूण 20 हजार 467 क्विंटल कपाशीची आवक झाली. यामध्ये वर्धा मार्केटमध्ये 8 हजार 886 क्विंटल कपाशीची सर्वाधिक आवक नोंदवण्यात आली. कपाशीला 7509 ते 8010 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच बीड मार्केटमध्ये आवक झालेल्या 508 क्विंटल कपाशीला 8019 रुपये प्रतिक्विंटल सर्वाधिक दर मिळाला. मंगळवारी मिळालेल्या दराच्या तुलनेत आज कपाशीच्या दरात किंचित वाढ झाल्याचं दिसून येत आहे.
advertisement
कांद्याच्या दरात स्थिरता
राज्याच्या कृषी बाजारात आज एकूण 2 लाख 27 हजार 687 क्विंटल कांद्याची आवक झाली. यापैकी नाशिक मार्केटमध्ये 88 हजार 726 क्विंटल लाल कांद्याची सर्वाधिक आवक झाली. कांद्याला 539 ते 2112 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. सांगली मार्केटमध्ये लोकल कांद्याला 600 ते 2800 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. मंगळवारी मिळालेल्या कांद्याच्या सर्वाधिक दरांच्या तुलनेत आज दर स्थिर असल्याचं चित्र आहे.
advertisement
सोयाबीनच्या दरात वाढ
आज राज्यातील कृषी बाजारात एकूण 54 हजार 122 क्विंटल सोयाबीनची आवक नोंदवण्यात आली. यामध्ये लातूर मार्केटमध्ये 17 हजार 716 क्विंटल सोयाबीनची सर्वाधिक आवक झाली. सोयाबीनला 4148 ते 4860 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच वाशिम मार्केटमध्ये पिवळ्या सोयाबीनला 6050 रुपये प्रतिक्विंटल सर्वाधिक दर मिळाला. मंगळवारी मिळालेल्या दरांच्या तुलनेत आज सोयाबीनच्या दरात वाढ झाल्याचं दिसून येत आहे.
advertisement
तुरीच्या दरात किंचित वाढ
राज्याच्या कृषी बाजारात आज एकूण 13 हजार 451 क्विंटल तुरीची आवक झाली. यापैकी जालना मार्केटमध्ये 2 हजार 551 क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक नोंदवण्यात आली. पांढऱ्या तुरीला 5500 ते 7590 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच जालना मार्केटमध्ये आवक झालेल्या 20 क्विंटल काळ्या तुरीला 7937 रुपये प्रतिक्विंटल सर्वाधिक दर मिळाला. मंगळवारी मिळालेल्या दरांच्या तुलनेत आज तुरीच्या दरात किंचित वाढ झालेली दिसून येत आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
कापूस आणि सोयाबीन दरात पुन्हा वाढ, तुरीला काय मिळाला भाव? एका क्लिकवर चेक करा
Next Article
advertisement
Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement