नवीन वर्षाच्या मुहूर्तावर छ. संभाजीनगरात करणार हनुमान चालीसाचं पठण, कुठे पार पडणार 'हा' सोहळा

Last Updated:

भारतीय संस्कृती आपल्या सर्वांना माहिती व्हावी याकरता छत्रपती संभाजी नगर शहरातील खडकेश्वर या ठिकाणी रात्री बारा वाजेपर्यंत हनुमान चालीसाचं पठण करणार आहे.

+
सव्वा

सव्वा लाख हनुमान चालीसाच पाठ करणार या ठिकाणी

छत्रपती संभाजीनगर: 2025 चा आज शेवटचा दिवस म्हणजे थर्टी फर्स्ट म्हटले की आपल्याकडे पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण केले जात आहे. थर्टीफर्स्टच्या दिवशी अनेक जण पार्टी करतात वेगळ्या प्रकारचे व्यसन करतात पण या सगळ्या गोष्टींपासून आपली नवीन पिढी दूर राहावी आणि आपली भारतीय संस्कृती आपल्या सर्वांना माहिती व्हावी याकरता छत्रपती संभाजी नगर शहरातील खडकेश्वर या ठिकाणी रात्री बारा वाजेपर्यंत हनुमान चालीसाचं पठण करणार आहे. याची माहिती दिलेली आहे आयोग विपिन तोष्णीवाल यांनी.
छत्रपती संभाजीनगर शहरातील खडकेश्वर या ठिकाणी दुपारपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हनुमान चालीसांचे पाठ करणार आहेत. यामध्ये सर्व तरुण सहभागी होतात त्यासोबत सर्व वैयक्तिक सहभागी होतात. आठ वर्षापासून हा उपक्रम या ठिकाणी राबविण्यात येत आहे. रात्री बारा वाजता हनुमान चालीसाच्या पाठाने नवीन वर्षाचा स्वागत केले जातं. त्यासोबतच या ठिकाणी मोठे मोठे जे महंत आहेत त्यासोबत जे महाराज आहेत ते देखील या ठिकाणी येत असतात. तसं त्या ठिकाणी रात्री बारा वाजेपर्यंत यज्ञ देखील करण्यात येतो.
advertisement
रात्री बारानंतर या ठिकाणी सर्वांसाठी महाप्रसादाचा देखील आयोजन केले जातं.‎ महाराष्ट्रातील 25 जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येतो. यावर्षीच्या संभाजीराजे 31 हजार पेक्षा देखील जास्त हनुमान चालीसा पाठ होणार आहेत अशी माहिती आयोजकांनी दिलेली आहे. आणि संपूर्ण 25 ठिकाणी मिळून दीड लाखांपर्यंत हनुमान चालीसा पाठवणार आहेत असं आयोजकांनी सांगितलेलं आहे. आठ वर्षापासून हा उपक्रम या ठिकाणी राबविण्यात येतो आहे. नवीन पिढीला आपली संस्कृती माहिती व्हावी आणि पश्चिमहात्त्य संस्कृतीचा आपण आकारण करू नये याकरता हे केलं जातं. आयोजकांनी सांगितला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नवीन वर्षाच्या मुहूर्तावर छ. संभाजीनगरात करणार हनुमान चालीसाचं पठण, कुठे पार पडणार 'हा' सोहळा
Next Article
advertisement
Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement