Municipal Election : कल्याणमध्ये हॅट्ट्रिक, आता जळगावमध्ये खातं उघडलं, भाजपचा पहिला उमेदवार बिनविरोध

Last Updated:

कल्याण महापालिका निवडणुकीत भाजपच्या तीन महिला उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर आता भाजपने जळगाव महापालिकेत खातं उघडलं आहे. जळगाव महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 12 ब मधून उज्वला बेंडाळे या बिनविरोध निवडून आल्या आहेत

jalgaun municipal election 2026
jalgaun municipal election 2026
Jalgaun Municipale Election 2026 :विजय वाघमारे, प्रतिनिधी, जळगाव : कल्याण महापालिका निवडणुकीत भाजपच्या तीन महिला उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर आता भाजपने जळगाव महापालिकेत खातं उघडलं आहे. जळगाव महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 12 ब मधून उज्वला बेंडाळे या बिनविरोध निवडून आल्या आहेत.त्यांच्या विरोधात छाननीत दोघंही उमेदवारी अर्ज बाद झाल्याने उज्वला बेंडाळे यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्यामुळे निवड बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले आहे.या बिनविरोध निवडीनंतर उज्वला बेंडाळे यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला आहे.
जळगाव महापालिकेत भाजपने अखेर खाते उघडले असून प्रभाग क्रमांक १२ ब मधून उज्वला बेंडाळे या बिनविरोध निवडून आल्या आहेत.त्यांच्या विरोधात छाननीत दोघंही उमेदवारी अर्ज बाद झाल्याने उज्वला बेंडाळे यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्यामुळे निवड बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
उज्वला बेंडाळे या भाजपच्या माजी जळगाव शहरप्रमुख होत्या. त्यांच्या बिनविरोध निवडीमुळे भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या बाहेर फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंद साजरा केला. दरम्यान बिनविरोध झाल्यानंतर उज्वला बेंडाळे यांची ही हॅट्रिक असून ते तिसऱ्यांदा महापालिकेच्या सभागृहात जाणार आहेत. उज्वला बेंडाळे यांनी उद्यापासून आपण आपल्या प्रवर्गासह शहरात भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासह प्रभागातील समस्या सोडविण्यावर भर देणार असल्याचे सांगितले.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Municipal Election : कल्याणमध्ये हॅट्ट्रिक, आता जळगावमध्ये खातं उघडलं, भाजपचा पहिला उमेदवार बिनविरोध
Next Article
advertisement
Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement