Alcohol Fact : दारु पिताना यावेळी चुक केली पण पुढच्यावेळी करु नका; म्हणजे हँगओवर होणार नाही
- Published by:Devika Shinde
Last Updated:
सेलिब्रेशनच्या ओघात आपण आनंदाने ग्लास रिकामे करतो, पण खरी अडचण सुरू होते दुसऱ्या दिवशी सकाळी. डोके जड होणे, मळमळणे, अस्वस्थ वाटणे आणि प्रचंड थकवा येणे म्हणजेच 'हँगओवर'.
मैत्र-मैत्रिणींची पार्टी असो, लग्नसमारंभ असो किंवा विकेंडचे सेलिब्रेशन; आनंदाच्या क्षणी दारुच्या ग्लासांनी 'चीअर्स' करणे ही आजकाल अनेकांच्या जीवनशैलीचा भाग झाली आहे. त्यात आता 31 ला लोक जास्तच जोशात असतात. सेलिब्रेशनच्या ओघात आपण आनंदाने ग्लास रिकामे करतो, पण खरी अडचण सुरू होते दुसऱ्या दिवशी सकाळी. डोके जड होणे, मळमळणे, अस्वस्थ वाटणे आणि प्रचंड थकवा येणे म्हणजेच 'हँगओवर'.
advertisement
advertisement
रिकाम्या पोटी कधीच पिऊ नका (Never Drink on an Empty Stomach)सर्वात मोठी चूक लोक इथेच करतात. जेव्हा तुमचे पोट रिकामे असते, तेव्हा अल्कोहोल थेट रक्तामध्ये शोषले जाते आणि त्याचा परिणाम मेंदूवर लवकर होतो. पिण्याआधी काहीतरी पौष्टिक किंवा फॅट्स असलेले पदार्थ (उदा. पनीर, दाणे किंवा थोडे जेवण) खावे. यामुळे अल्कोहोल शोषण्याचा वेग मंदावतो.
advertisement
advertisement
रंगीत आणि स्वस्त दारू टाळा (Beware of Congeners)विस्की, रम किंवा रेड वाईन यांसारख्या गडद रंगाच्या अल्कोहोलमध्ये 'कॉन्जेनर्स' (Congeners) नावाचे घटक जास्त असतात, ज्यामुळे तीव्र हँगओवर होऊ शकतो. याउलट वोडका किंवा जीन यांसारख्या क्लिअर ड्रिंक्सचा हँगओवर कमी असतो. तसेच, निकृष्ट दर्जाची किंवा स्वस्त दारू पिणे टाळा, कारण त्यात भेसळ असण्याची शक्यता जास्त असते.
advertisement
advertisement
advertisement
हँगओवर झालाच तर काय करावे?जर चुकून तुम्हाला हँगओवर झालाच, तर सकाळी उठल्यावर लिंबू पाणी, नारळ पाणी किंवा आल्याचा चहा घ्या. 'ब्लॅक कॉफी' पिणे टाळा, कारण यामुळे डिहायड्रेशन वाढू शकते. अति मद्यपान आरोग्यासाठी हानिकारक आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. पण जर तुम्ही सामाजिक कारणास्तव मद्यपान करत असाल, तर वरील नियमांचे पालन केल्यास तुमचा पुढचा दिवस वाया जाणार नाही. जबाबदारीने प्या आणि स्वतःची काळजी घ्या.
advertisement










