हटके आंदोलनाची किंमत चुकवावीच लागली, मंगेश साबळेंच्या पोतराज आंदोलनानंतर प्रशासनाचा कारवाईचा दणका

Last Updated:

आपल्या हटके आंदोलनामुळे नेहमीच चर्चेत असलेले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गेवराई येथील सरपंच मंगेश साबळे यांनी पुन्हा एकदा आगळ्यावेगळ्या आंदोलनाने लक्ष वेधून घेतले.

+
आंदोलन

आंदोलन

आपल्या हटके आंदोलनामुळे नेहमीच चर्चेत असलेले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गेवराई येथील सरपंच मंगेश साबळे यांनी पुन्हा एकदा आगळ्यावेगळ्या आंदोलनाने लक्ष वेधून घेतले. भोकरदन तहसील कार्यालयात पोतराजाच्या वेशात डफली घेऊन साबळे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. परंतु त्यांचे हेच आंदोलन त्यांच्याच अंगलट आलं असून प्रशासनाने शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा त्यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यावर दाखल केलाय. यानंतर संतप्त झालेल्या मंगेश साबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कायद्याच्या विषयामध्ये पुन्हा एकदा आंदोलन केलंय, पाहूयात काय आहे हे संपूर्ण प्रकरण.
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी विकास जाधव आणि नारायण लोखंडे हे तरुण शेतकरी भोकरदन तहसील कार्यालय समोर मागील अनेक दिवसांपासून उपोषण आंदोलन करत होते. आंदोलनाला अनेक दिवस उलटल्यानंतरही तहसीलदार आणि प्रशासनाने त्यांच्या आंदोलनाची कोणतीही दखल घेतली नाही. यामुळे आंदोलकांनी मंगेश साबळे यांच्याशी संपर्क साधला आणि साबळे यांनी तत्काळ प्रतिसाद देत पोतराजाच्या विषयामध्ये डफडं वाजून अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर धारेवर धरलं. मंगेश साबळे यांनी शेतकऱ्यांचा विषय लावून धरल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांच्या मागण्या मान्य देखील केल्या.
advertisement
परंतु आंदोलन करते साबळे आणि त्यांच्या सहकार्यांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्रा घेतला आणि 31 डिसेंबर 2025 रोजी कायद्याच्या विषयामध्ये आंदोलन केलं. यावेळी सरकार हमसे डरती हे पोलीस को आगे करती है, शेतकऱ्यांना न्याय माग न गुन्हा असेल तर आम्हाला फाशी द्या अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. मंगेश साबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेली ही दोन्ही आंदोलने परिसरात चर्चेचा विषय ठरली. तसेच प्रशासनाने घेतलेल्या भूमिकेचा देखील ऊहापोह नागरिकांकडून केला जातोय. दरम्यान मंगेश साबळे आणि सहकाऱ्यांच्या या भूमिके नंतर प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
हटके आंदोलनाची किंमत चुकवावीच लागली, मंगेश साबळेंच्या पोतराज आंदोलनानंतर प्रशासनाचा कारवाईचा दणका
Next Article
advertisement
Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement