advertisement

शेवग्याच्या शेंगाचा भाव गगनाला भिडला, डाळिंबासह इतर फळभाजांची स्थिती काय?

Last Updated:

बुधवार, दिनांक 31 डिसेंबर रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये गुळ, शेवगा आणि डाळिंबाची आवक व भाव पाहू.

+
पहा

पहा वर्षाअखेरीस कसे राहिले राज्याचे कृषीमार्केट

मुंबई: बुधवार, दिनांक 31 डिसेंबर रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये गुळ, शेवगा आणि डाळिंबाची आवक व भाव पाहू.
गुळाच्या आवकेत सुधारणा: राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 2146 क्विंटल गुळाची आवक झाली. यापैकी मुंबई बाजारात 886 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 5200 ते 5700 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच जालना मार्केटमध्ये आवक झालेल्या 224 क्विंटल गुळास 3100 रुपये सर्वात कमी सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.
शेवग्याच्या शंभर क्विंटलची वाढ: राज्याच्या मार्केटमध्ये आज 131 क्विंटल शेवग्याची आवक झाली. यापैकी मुंबई मार्केटमध्ये सर्वाधिक 116 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 18000 ते 22000 रुपये दरम्यान प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच छत्रपती संभाजीनगर मार्केटमध्ये आवक झालेल्या 5 क्विंटल शेवग्यास 23500 रुपयांपर्यंत बाजारभाव सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
डाळिंब दराची तेजी कायम: आज राज्याच्या मार्केटमध्ये 1390 क्विंटल डाळिंबाची एकूण आवक झाली. यापैकी 684 क्विंटल सर्वाधिक आवक मुंबई बाजारात राहिली. त्यास सर्वसाधारण 12500 रुपये बाजारभाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 3 क्विंटल डाळिंबास प्रतीनुसार 10000 ते 20000 रुपयांपर्यंत सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
शेवग्याच्या शेंगाचा भाव गगनाला भिडला, डाळिंबासह इतर फळभाजांची स्थिती काय?
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement