कपाशीच्या दरात किंचित वाढ
कृषी मार्केटमधील वेबसाईटवरील सायंकाळी 6.30 वाजताच्या रिपोर्टनुसार, आज राज्याच्या कृषी बाजारात एकूण 20 हजार 467 क्विंटल कपाशीची आवक झाली. यामध्ये वर्धा मार्केटमध्ये 8 हजार 886 क्विंटल कपाशीची सर्वाधिक आवक नोंदवण्यात आली. कपाशीला 7509 ते 8010 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच बीड मार्केटमध्ये आवक झालेल्या 508 क्विंटल कपाशीला 8019 रुपये प्रतिक्विंटल सर्वाधिक दर मिळाला. मंगळवारी मिळालेल्या दराच्या तुलनेत आज कपाशीच्या दरात किंचित वाढ झाल्याचं दिसून येत आहे.
advertisement
Weather Alert : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रावर हिम लाटेचं सावट, हवामान खात्याकडून अलर्ट
कांद्याच्या दरात स्थिरता
राज्याच्या कृषी बाजारात आज एकूण 2 लाख 27 हजार 687 क्विंटल कांद्याची आवक झाली. यापैकी नाशिक मार्केटमध्ये 88 हजार 726 क्विंटल लाल कांद्याची सर्वाधिक आवक झाली. कांद्याला 539 ते 2112 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. सांगली मार्केटमध्ये लोकल कांद्याला 600 ते 2800 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. मंगळवारी मिळालेल्या कांद्याच्या सर्वाधिक दरांच्या तुलनेत आज दर स्थिर असल्याचं चित्र आहे.
सोयाबीनच्या दरात वाढ
आज राज्यातील कृषी बाजारात एकूण 54 हजार 122 क्विंटल सोयाबीनची आवक नोंदवण्यात आली. यामध्ये लातूर मार्केटमध्ये 17 हजार 716 क्विंटल सोयाबीनची सर्वाधिक आवक झाली. सोयाबीनला 4148 ते 4860 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच वाशिम मार्केटमध्ये पिवळ्या सोयाबीनला 6050 रुपये प्रतिक्विंटल सर्वाधिक दर मिळाला. मंगळवारी मिळालेल्या दरांच्या तुलनेत आज सोयाबीनच्या दरात वाढ झाल्याचं दिसून येत आहे.
तुरीच्या दरात किंचित वाढ
राज्याच्या कृषी बाजारात आज एकूण 13 हजार 451 क्विंटल तुरीची आवक झाली. यापैकी जालना मार्केटमध्ये 2 हजार 551 क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक नोंदवण्यात आली. पांढऱ्या तुरीला 5500 ते 7590 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच जालना मार्केटमध्ये आवक झालेल्या 20 क्विंटल काळ्या तुरीला 7937 रुपये प्रतिक्विंटल सर्वाधिक दर मिळाला. मंगळवारी मिळालेल्या दरांच्या तुलनेत आज तुरीच्या दरात किंचित वाढ झालेली दिसून येत आहे.





