TRENDING:

कृषी हवामान : पावसाचा कहर! पुढील 24 तास धोक्याचे,पुराची शक्यता, या जिल्ह्यांना रेड अलर्ट जाहीर

Last Updated:

Maharashtra Weather Update :भारतीय हवामान विभागाने (IMD) 14 जुलै रोजी राज्याच्या विविध भागांसाठी महत्त्वाचा हवामान अंदाज जाहीर केला आहे. जुलै महिना म्हणजे मान्सूनचा मुख्य टप्पा आणि यावर्षीही पावसाचा जोर वाढणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : भारतीय हवामान विभागाने (IMD) 14 जुलै रोजी राज्याच्या विविध भागांसाठी महत्त्वाचा हवामान अंदाज जाहीर केला आहे. जुलै महिना म्हणजे मान्सूनचा मुख्य टप्पा आणि यावर्षीही पावसाचा जोर वाढणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाचा जोर जाणवणार आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने काही जिल्ह्यांना यलो आणि रेड अलर्ट जारी केला आहे.
agriculture news
agriculture news
advertisement

कोकणात पावसाचा कहर

कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेषतः रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यामुळे नद्यांचे पाणीपातळी वाढू शकते, तर काही भागांत पूरस्थितीही उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पश्चिम महाराष्ट्रात घाटमाथ्यावर पाऊस

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुणे आणि साताऱ्यातील घाटमाथ्यांवर विशेषतः अधिक पावसाची शक्यता आहे. पावसामुळे शेतपिकांना फायदेशीर वातावरण तयार होईल, मात्र हवामान विभागाने शेतकऱ्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. दमट हवामानामुळे कीड आणि रोगांचा धोका वाढतो, त्यामुळे कीटकनाशकांची फवारणी वेळेवर करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

advertisement

मराठवाडा आणि विदर्भातही पावसाचे आगमन

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण राहणार असून, काही ठिकाणी जोराचा पाऊसही पडू शकतो. विदर्भातील नागपूर, अमरावती, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्येही हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. या पावसामुळे खरीप पिकांसाठी पोषक हवामान तयार होईल.

advertisement

उत्तर महाराष्ट्रातही पावसाची हजेरी

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. नाशिकच्या घाट परिसरात विशेषतः अधिक पाऊस पडू शकतो. पावसामुळे काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे प्रवाशांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कुठे कोणता अलर्ट?

रेड अलर्ट: रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता हवामान विभागाने रेड अलर्ट जाहीर केला आहे.

advertisement

येलो अलर्ट: ठाणे, रायगड, पुणे, नाशिक आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात आज वाढ की घट? कोणत्या मार्केटमध्ये किती मिळाला भाव? Video
सर्व पहा

राज्यातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मराठी बातम्या/कृषी/
कृषी हवामान : पावसाचा कहर! पुढील 24 तास धोक्याचे,पुराची शक्यता, या जिल्ह्यांना रेड अलर्ट जाहीर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल