APMC Market: हळदीनं मार्केट खाल्लं, डाळिंब अन् आल्याला किती मिळाला भाव?
- Reported by:Priti Nikam
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
APMC Market: महाराष्ट्रातील कृषी मार्केटमध्ये मोठे उलटफेर जाणवले. डाळिंब, हळद आणि आल्यांच्या दरांचं अपडेट जाणून घेऊ.
सांगली: राज्यातील कृषी मार्केटमध्ये आज मोठ्या घडामोडी दिसल्या. प्रमुख शेतमालाच्या दरांमध्ये पुन्हा महत्त्वाचे बदल झालेत. सोमवार, 2 फेब्रुवारी 2026 रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या आले, हळद आणि डाळिंबाची आवक आणि त्यांचे दर याबाबत अपडेट जाणून घेऊ.
आल्याच्या आवकेत सुधारणा
राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 3137 क्विंटल आल्याची आवक झाली. यापैकी मुंबई मार्केटमध्ये सर्वाधिक 1189 क्विंटल आल्याची आवक झाली. त्यास प्रतीनुसार 4000 ते 5800 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक बाजारभाव मिळाला. तसेच अहिल्यानगर मार्केटमध्ये आवक झालेल्या 22 क्विंटल आल्यास 2250 रुपये सर्वात कमी बाजारभाव मिळाला.
advertisement
हळदीला दराची झळाळी
राज्याच्या मार्केटमध्ये केवळ 1350 क्विंटल राजापुरी हळदीची आवक हिंगोली मार्केटमध्ये झाली. त्यास प्रतीनुसार 13900 ते 16400 रुपये दरम्यान उच्चांकी बाजारभाव मिळाला.
डाळिंबाच्या दरात चढ-उतार
आज राज्याच्या मार्केटमध्ये 502 क्विंटल डाळिंबाची एकूण आवक झाली. यापैकी मुंबई मार्केटमध्ये 294 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 10000 ते 16000 रुपये दरम्यान दर मिळाला. तसेच सोलापूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 30 क्विंटल डाळिंबास 1200 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वात कमी बाजारभाव मिळाला.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
Feb 02, 2026 10:02 PM IST







