advertisement

390 फूट खोल दरी, आधी बॅग सापडली अन्.., लोणावळ्यातील टायगर पॉईंट मुंबईच्या श्रेयासोबत भयानक घडलं

Last Updated:

News18
News18
गणेश दुडम, प्रतिनिधी
मावळ: पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लोणावळ्यात ट्रेकसाठी आलेल्या मुंबईतील एका १९ वर्षी तरुणीचा ड्युक्स नोज परिसरात अपघाती मृत्यू झाला. अखेरीस दोन दिवसानंतर टायगर पॉईंट इथं 390 फूट खोल दरीतून या तरुणीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. धोकादायक दरी, अंधार आणि वेळेशी झुंज देत हे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी करण्यात आलं होतं.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, लोणावळ्यात ड्युक्स नोज परिसरात ३१ जानेवारी रोजी ही घटना घडली होती.  श्रेया पटी (वय १९) असं या तरुणीचं नाव आहे.  दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी मुंबई इथं राहणारी श्रेया पटी ही लोणावळ्याला ट्रेकसाठी आली होती. ड्युक्स नोज परिसरात ट्रेक करण्यासाठी ती गेली, मात्र संध्याकाळपर्यंत ती घरी परतली नाही. त्यामुळे सगळीकडे तिचा शोध सुरू झाला. रात्री नातेवाईकांनी शोध घेत लोणावळ्यात चौकशी केली. त्यावेळी ती परिसरात ट्रेकिंगसाठी आलेली होती आणि परत न गेल्याची माहिती मिळाली.
advertisement
टायगर पॉईंट परिसरात सापडली बॅग
रात्र झाली तरी श्रेया परतली नसल्यामुळे कुटुंबीयांनी लोणावळ्यात धाव घेतली.  दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तिचा शोध घेतला. पण, कुठेच श्रेयाचा पत्ता लागला नाही. अखेरीस दिनांक १ फेब्रुवारी रोजी सकाळी नातेवाईकांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी या परिसरात शोध सुरू केला. तेव्हा टायगर पॉईंट परिसरात एक बॅग सापडली होती. ही सापडलेली बॅग ही श्रेयाचीच असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता रेस्क्यू टीमला शोध मोहिमेसाठी पाचारण करण्यात आलं. शिवदुर्ग रेस्क्यू टीमने घटनास्थळी पोहोचून दुपारी २.३० वाजता शोध मोहीम सुरू केली. डॉग स्क्वॉड, पोलीस ड्रोन आणि नंतर लाइटनिंग ड्रोनच्या सहाय्याने शोध सुरू असतानाच दुपारी ४.४५ वाजता सुमारे ३९० फूट खोल दरीत मुलीचा मृतदेह आढळून आला.
advertisement
दुसऱ्या दिवशी मृतदेह काढला बाहेर
अंधार असतानाही अत्यंत कठीण परिस्थितीत दोरी, स्ट्रेचर आणि वॉकी-टॉकीच्या सहाय्याने मृतदेह सुरक्षितपणे वर काढण्यात आला. रात्री ९.३० वाजता मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. ही संपूर्ण शोध मोहीम पोलीस प्रशासनाच्या आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या धाडसाने यशस्वी झाली. मात्र, श्रेया पटी या तरुणाचा मृत्यू कसा झाला, याबद्दल अद्याप ठोस अशी माहिती समोर आली आहे. ट्रेकिंग दरम्यान पाय घसरून दरीत कोसळली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. श्रेयाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासाकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. त्यानंतर पुढे तो नातेवाईकांकडे सोपवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस यंत्रणा करीत आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
390 फूट खोल दरी, आधी बॅग सापडली अन्.., लोणावळ्यातील टायगर पॉईंट मुंबईच्या श्रेयासोबत भयानक घडलं
Next Article
advertisement
SIM Cardमधून काढलं 26,55, 424 रुपयेचे सोनं; जुन्या सिम कार्डसाठी मार्केटमध्ये झुंबड उडाली, पण एका चुकीने जीवही जाऊ शकतो
SIM Cardमधून काढलं 26,55,424 रुपयेचे सोनं; जुन्या सिम कार्डसाठी झुंबड उडाली
  • जुन्या SIM कार्डमधून निघालं सोनं

  • SIM कार्डसाठी लोकांची झुंबड

  • पण एका चुकीने जीवही जाऊ शकतो

View All
advertisement