advertisement

भाजप खासदार मनोज तिवारींच्या ताफ्यातील वाहन आणि रिक्षाचा अपघात, 5 जण जखमी

Last Updated:

भाजपाचे खासदार मनोज तिवारी पारोळा इथं एका धार्मिक कार्यक्रमासाठी आले होते. मनोज तिवारी यांना वाय प्लस सुरक्षा असल्यामुळे

News18
News18
विजय वाघमारे, प्रतिनिधी
जळगाव:  जळगावमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भाजपाचे खासदार मनोज तिवारी यांच्या ताफ्यातील वाहनाने एका रिक्षाला जोराची धडक दिली. या अपघातात  ५ जण जखमी झाले आहे. जखमी प्रवाशांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,  जळगाव शहरातील मेहरून तलावाजवळ ही घटना घडली आहे. भाजपाचे खासदार मनोज तिवारी यांच्या ताफ्यातील पोलीस एस्कॉर्ट वाहन आणि रिक्षाचा अपघात झाला. या अपघातात रिक्षातील पाच जण जखमी झाले आहे.  पोलिसांची एस्कॉर्ट वाहन भाजपाचे खासदार मनोज तिवारी यांना संभाजीनगरच्या हद्दीत सोडून परत येत असताना हा अपघात झाला.  खड्डा चुकवीत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे रिक्षा मातीच्या ढिगार्‍यावरून पोलीस वाहनाला धडकल्यामुळे हा अपघात झाल्याचं सांगण्यात आलं आहे.
advertisement
भाजपाचे खासदार मनोज तिवारी पारोळा इथं एका धार्मिक कार्यक्रमासाठी आले होते. मनोज तिवारी यांना वाय प्लस सुरक्षा असल्यामुळे जळगाव जिल्ह्यातून त्यांना पोलिसांचे एस्कॉर्ट वाहन देण्यात आलं होतं आणि तेच वाहन परत येत असताना अपघात झाल्याची पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांची माहिती दिली. या अपघातात अपघातात रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. तर एस्कॉर्ट पोलीस वाहनाचंही मोठं नुकसान झालं आहे.
advertisement
या अपघातातील जखमींना तातडीने जळगाव शासकीय आणि वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल केलं आहे. जखमींवर उपचार सुरू आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. हा अपघात रस्त्यातील खड्ड्यांमुळे झाल्याची जखमींनी माहिती दिली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भाजप खासदार मनोज तिवारींच्या ताफ्यातील वाहन आणि रिक्षाचा अपघात, 5 जण जखमी
Next Article
advertisement
SIM Cardमधून काढलं 26,55, 424 रुपयेचे सोनं; जुन्या सिम कार्डसाठी मार्केटमध्ये झुंबड उडाली, पण एका चुकीने जीवही जाऊ शकतो
SIM Cardमधून काढलं 26,55,424 रुपयेचे सोनं; जुन्या सिम कार्डसाठी झुंबड उडाली
  • जुन्या SIM कार्डमधून निघालं सोनं

  • SIM कार्डसाठी लोकांची झुंबड

  • पण एका चुकीने जीवही जाऊ शकतो

View All
advertisement