advertisement

भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांची परस्पर घोषणा; Trade Deal जाहीर करून टॅरिफ 18 टक्के केल्याचा दावा

Last Updated:

US India Trade Deal: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी सांगितले की, त्यांनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका नवीन व्यापार करारावर सहमती दर्शवली आहे. ज्यामुळे दोन्ही देशांमधील परस्पर आयात शुल्कात कपात होईल.

News18
News18
वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी मोठी घोषणा केली. अमेरिका आणि भारत यांनी एक द्विपक्षीय व्यापार करार (bilateral trade deal) वर तात्काळ सहमती दर्शवल्याचे त्यांनी सांगितले. या करारा अंतर्गत दोन्ही देशांमधील टॅरिफ (reciprocal tariffs) कमी करण्यात येणार आहेत. ट्रम्प यांनी त्यांच्या फोन संभाषणाचे तपशील जाहीर करताना सांगितले की, अमेरिका त्वरित प्रभावी होऊन भारतीय वस्तूंवर आता 25 टक्क्यांऐवजी 18 टक्के टॅरिफ आकारणार आहे. भारतही आपल्या बाजूने अमेरिकन वस्तूंवरील टॅरिफ आणि नॉन-टॅरिफ अडथळे ‘शून्य’ करण्याची योजना आहे, असे त्यांनी दावा केला आहे.
ट्रम्प यांनी सांगितले की हा करार त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या फोन संभाषणानंतर केला आहे. ट्रम्प यांनी मोदींना “माझ्या महान मित्रांपैकी एक” असे संबोधले आणि सांगितले की त्यांनी व्यापार, ऊर्जा सहकार्य आणि युक्रेनवरील युद्धाबाबतही चर्चा केली. ट्रम्प यांनी दावा केला की भारताने रशियन तेल खरेदी थांबवण्यास सहमती दर्शवली आहे आणि अमेरिकेतून (कदाचित व्हेनेझुएलातूनही) जास्त तेल खरेदी करेल, ज्यामुळे युक्रेनमधील युद्धाचा शेवट करण्यास मदत होईल असा दावा त्यांनी केला.
advertisement
ट्रम्प यांच्या ट्विटमध्ये असेही म्हटले की, भारत आता अमेरिकन वस्तू आणि सेवा जास्त प्रमाणात खरेदी करेल, ज्यामध्ये अमेरिकन ऊर्जा, तंत्रज्ञान, कृषी उत्पादनं, कोळसा आणि इतर निर्यातींचा $500 अब्जपेक्षा अधिकचा व्यापार समाविष्ट आहे. “आपला भारतासोबतचा संबंध आता आणखी बळकट होईल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मात्र भारतीय सरकारकडून याबाबत कोणतीही त्वरित किंवा अधिकृत दुजोरा अद्याप मिळालेली नाही.
advertisement
या कराराचा व्यापारी, अर्थव्यवस्थात्मक आणि राजकीय परिणाम महत्त्वाचे ठरू शकतात. विशेषतः जागतिक व्यापार, ऊर्जा धोरणे आणि द्विपक्षीय संबंधांवर त्याचा परिणाम होऊ शकतो.
view comments
मराठी बातम्या/मनी/
भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांची परस्पर घोषणा; Trade Deal जाहीर करून टॅरिफ 18 टक्के केल्याचा दावा
Next Article
advertisement
SIM Cardमधून काढलं 26,55, 424 रुपयेचे सोनं; जुन्या सिम कार्डसाठी मार्केटमध्ये झुंबड उडाली, पण एका चुकीने जीवही जाऊ शकतो
SIM Cardमधून काढलं 26,55,424 रुपयेचे सोनं; जुन्या सिम कार्डसाठी झुंबड उडाली
  • जुन्या SIM कार्डमधून निघालं सोनं

  • SIM कार्डसाठी लोकांची झुंबड

  • पण एका चुकीने जीवही जाऊ शकतो

View All
advertisement