IND vs PAK : 2 पॉईंट्स पाहिजे असतील तर... बहिष्कारानंतर पाकिस्तानची नवी नौटंकी, भारतासमोर ठेवला एकच ऑप्शन!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या सामन्यावरून सुरू असलेला वाद कमी होत नाहीये. 15 फेब्रुवारीच्या या सामन्याआधी पाकिस्तानने नवी नौटंकी सुरू केली आहे.
मुंबई : टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या सामन्यावरून सुरू असलेला वाद कमी होत नाहीये. पाकिस्तान 15 फेब्रुवारीला कोलंबोमध्ये होणाऱ्या भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार करणार आहे, अशी घोषणा रविवारी पाकिस्तान सरकारने केली आहे, पण या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकत असल्याचा कोणताही अधिकृत मेल आयसीसीला पाठवणार नाही, असं वृत्त समोर आलं आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बहिष्काराच्या या निर्णयाबाबत आयसीसीला सूचित केलं नाही, तर भारत-पाकिस्तान मॅच सक्रिय राहिल त्यामुळे हा वाद येत्या काही दिवसांमध्येही सुरू राहिल. आयसीसी पीसीबीकडून अधिकृत माहितीची वाट पाहत आहे, जोपर्यंत पीसीबी भारताविरुद्धच्या सामन्यावर पाकिस्तान बहिष्कार टाकत आहे, तोपर्यंत आयसीसी पुढचं पाऊल टाकणार नाही.
टीम इंडियाला कोलंबोला जावं लागणार
टीम इंडिया 15 फेब्रुवारीच्या पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 वर्ल्ड कप मॅचसाठी कोलंबोला जाणार आहे, तसंच एक दिवस आधी होणाऱ्या पत्रकार परिषदेमध्येही भाग घेईल. एवढंच नाही तर कर्णधार सूर्यकुमार यादवला टॉससाठी मैदानात यावं लागेल. या सामन्यासाठी पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा टॉससाठी आला नाही, तर मॅच रेफ्री टीम इंडियाचा विजय झाला असं घोषित करतील आणि भारताला 2 पॉईंट्स दिले जातील. भारतीय टीम मॅच खेळण्यासाठी कोलंबोला गेली नाही, तर रेफ्री दोन्ही टीमना एक-एक पॉईंट देतील.
advertisement
आयसीसी पाकिस्तानवर बंदी आणणार?
जर पाकिस्तानने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकला तर त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून हकालपट्टी व्हायची शक्यता आहे. तसंच आयसीसीने पाकिस्तानला टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर काढलं तर त्यांच्याऐवजी युगांडाला वर्ल्ड कप खेळण्याची संधी मिळेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 02, 2026 11:13 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : 2 पॉईंट्स पाहिजे असतील तर... बहिष्कारानंतर पाकिस्तानची नवी नौटंकी, भारतासमोर ठेवला एकच ऑप्शन!










