advertisement

APMC Market: कपाशी, कांद्याचं मार्केट हाललं, सोयाबिन, तुरीचे दर वाढले, कुठं किती मिळाला भाव?

Last Updated:

APMC Market: कृषी मार्केटमध्ये सोमवारी मोठ्या घडामोडी दिसल्या. कपाशी, कांदा, सोयाबीन आणि तुरीच्या दरांचे अपडेट जाणून घेऊ.

+
APMC

APMC Market: कपाशी, कांद्याचं मार्केट हाललं, सोयाबिन, तुरीचे दर वाढले, कुठं किती मिळाला भाव?

अमरावती: राज्यातील कृषी बाजार समित्यांमध्ये आज प्रमुख शेतमालाच्या दरांमध्ये पुन्हा महत्त्वाचे बदल झालेत. कपाशीच्या दरात घट नोंदवली गेली असताना, कांदा, सोयाबीन आणि तुरीच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. तसेच आवक देखील वाढली आहे. प्रमुख शेतमालाची आवक किती झाली? भाव किती मिळाला? जाणून घेऊ.
कपाशीच्या दरात घट
आज राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये कपाशीची एकूण 20 हजार 233 क्विंटल आवक झाली. यामध्ये वर्धा बाजारात 9 हजार 800 क्विंटल कपाशीची सर्वाधिक आवक नोंदवण्यात आली. या ठिकाणी कपाशीला किमान 7 हजार 475 ते कमाल 8 हजार 113 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. दरम्यान, वर्धा बाजारातच 8 हजार 144 रुपये प्रतिक्विंटल असा सर्वाधिक बाजारभाव नोंदवण्यात आला. मात्र, एकूणच आज कपाशीच्या दरात घसरण झाल्याचे बाजारातील आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
advertisement
कांद्याच्या दरात वाढ
राज्यात आज कांद्याची एकूण 2 लाख 89 हजार 512 क्विंटल आवक झाली. यामध्ये नाशिक बाजारात 1 लाख 31 हजार 625 क्विंटल लाल कांद्याची सर्वाधिक आवक नोंदवण्यात आली. या बाजारात कांद्याला किमान 364 ते कमाल 1 हजार 255 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. तर अमरावती बाजारात कांद्याला 2 हजार 800 रुपये प्रतिक्विंटल असा सर्वाधिक दर मिळाल्याची नोंद आहे. रविवारी नोंदवलेल्या उच्चांकी दराच्या तुलनेत आज कांद्याच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
advertisement
सोयाबीनच्या दरात सुधारणा
आज राज्यातील विविध बाजारांत सोयाबीनची एकूण 35 हजार 987 क्विंटल आवक झाली. लातूर बाजारात 9 हजार 395 क्विंटल सोयाबीनची सर्वाधिक आवक नोंदवली गेली. येथे सोयाबीनला किमान 5 हजार 443 ते कमाल 5 हजार 797 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. विशेष म्हणजे, बुलढाणा बाजारात सोयाबीनला 5 हजार 810 रुपये प्रतिक्विंटल असा सर्वाधिक बाजारभाव मिळाला असून, रविवारीच्या तुलनेत आज दरात वाढ नोंदवण्यात आली आहे.
advertisement
तुरीच्या दरातही वाढ
तुरीच्या बाजारातही आज सकारात्मक चित्र पाहायला मिळाले. राज्यभरात तुरीची एकूण 34 हजार 099 क्विंटल आवक झाली. यामध्ये वर्धा बाजारात 8 हजार 196 क्विंटल तुरीची सर्वाधिक आवक नोंदवण्यात आली. येथे तुरीला किमान 7 हजार 717 ते कमाल 8 हजार 653 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. दरम्यान, लातूर आणि वाशिम बाजारात तुरीला 9 हजार 100 रुपये प्रतिक्विंटल असा सर्वाधिक बाजारभाव मिळाल्याचे समोर आले आहे. रविवारीच्या तुलनेत आज तुरीच्या दरात वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
APMC Market: कपाशी, कांद्याचं मार्केट हाललं, सोयाबिन, तुरीचे दर वाढले, कुठं किती मिळाला भाव?
Next Article
advertisement
SIM Cardमधून काढलं 26,55, 424 रुपयेचे सोनं; जुन्या सिम कार्डसाठी मार्केटमध्ये झुंबड उडाली, पण एका चुकीने जीवही जाऊ शकतो
SIM Cardमधून काढलं 26,55,424 रुपयेचे सोनं; जुन्या सिम कार्डसाठी झुंबड उडाली
  • जुन्या SIM कार्डमधून निघालं सोनं

  • SIM कार्डसाठी लोकांची झुंबड

  • पण एका चुकीने जीवही जाऊ शकतो

View All
advertisement