Ajit Pawar Plane Crash : हा कोणता योगायोग... कॅप्टन सुमित कपूरची मुलगी वडिलांना कोणत्या नावाने हाक मारायची?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
बारामती विमान अपघातामध्ये अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला. या विमान अपघातात निधन झालेल्या कॅप्टन सुमित कपूर यांच्या मुलीने डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट लिहिली आहे.
मुंबई : बारामती विमान अपघातामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाला. 28 जानेवारीला अजित पवार मुंबईवरून बारामतीला चालले होते, तेव्हा बारामती विमानतळावर लॅन्डिंगच्या आधी अजित पवारांचं विमान कोसळलं, या अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला. अजित पवारांसोबत कॅप्टन सुमित कपूर, सहपायलट शांभवी पाठक, केबिन क्रू पिंकी माळी आणि पोलीस विदीप जाधव यांचं निधन झालं.
अजितदादांच्या मृत्यूने महाराष्ट्रात शोककळा पसरली असतानाच या विमान अपघातात मृत्यू झालेल्यांची कुटुंबही अजून धक्क्यात आहेत. कॅप्टन सुमित कपूर यांची मुलगी सान्या कपूरने वडिलांसाठी डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये सान्याने केलेल्या वडिलांच्या एका उल्लेखामुळे हा कोणता योगायोग आहे? असा प्रश्न पडला आहे. संपूर्ण महाराष्ट्र हा अजित पवारांना दादा म्हणून ओळखायचा आणि कॅप्टन सुमित कपूर यांची मुलगीही वडिलांना दादा म्हणायची. सान्या कपूरने तिच्या पोस्टच्या सुरूवातीला आणि शेवटी वडिलांचा उल्लेख दादा, असा केला आहे.
advertisement
advertisement
सुमित कपूर यांच्या मुलीचं पत्र
मला माहित नाही, मी हे का लिहित आहे पण मी प्रार्थना करतो की तुम्ही हे वाचा दादा. हे एक वाईट स्वप्न आहे, ज्यातून मला जागं व्हायचं आहे. मी अजूनही डोक्याला हात लावत आहे, तुम्ही मला फोन कराल आणि म्हणाल, कुठे आहे माझी झाशीची राणी?
advertisement
मी तुमच्यावर प्रेम करतो आणि मी नेहमीच वडिलांची परी असेन. मला फक्त हे दुःस्वप्न संपवायचे आहे आणि फोन करून तुमच्यासोबत बोलायचे आहे. तुमचा जन्म आकाशावर राज्य करण्यासाठी झाला आणि तुम्ही शेवटचा श्वासही तुम्हाला जे आवडतं ते करण्यात घेतलात.
सर्वोत्तम पिता, महान पायलट आणि सगळ्यात गोड माणूस
कॅप्टन सुमित कपूर तुम्ही खूप लवकर गेलात.
advertisement
आय लव्ह यू दादा
मी नेहमीच तुमची राहिन
तुमची
झाशी की रानी
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 02, 2026 9:51 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajit Pawar Plane Crash : हा कोणता योगायोग... कॅप्टन सुमित कपूरची मुलगी वडिलांना कोणत्या नावाने हाक मारायची?










