राष्ट्रवादीचे नेते आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ठिकठिकाणी श्रद्धांजली वाहिली जात आहे. बारामतीमध्ये सहयोग सोसायटी या निवासस्थानी सांत्वन भेटीसाठी राज्यभरातून अजितदादांवर प्रेम करणारे कार्यकर्ते पदाधिकारी भेटीसाठी पोहोचले होते. यावेळी एका दिव्यांग समर्थकाला पाहून सगळ्यांना गहिवरून आलं होतं. तर एक समर्थकाने अजितदादांचा फोटो हातावर टॅट्यू काढला होता.



