TRENDING:

शेती अवजारे गंजण्याचा धोका, मशागत केल्यावर कशी घ्यावी काळजी?

Last Updated:

पावसाळ्यात पाण्याने, चिखलाने आणि थंड हवामानाने लोखंड गंजण्याची क्रिया सुरू होते. त्यामुळे शेती उपयोगी अवजारे खराब होऊ लागतात. त्यांची काळजी कशी घ्यावी? याबाबत जाणून घेऊ.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रीती निकम, प्रतिनिधी
advertisement

सांगली: शेतीमध्ये आंतरमशागतीच्या सोयीसाठी अनेक शेतकरी शेती अवजारांचा उपयोग करतात. याच लोखंडी अवजारांना पावसाळ्यामध्ये गंज चढतो. पावसाळी हवामानाने लोखंड गंजण्याची क्रिया सुरू होऊन अवजारांचे आयुष्य कमी होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चामध्ये भर पडते. शेती अवजारांचा खर्च कमी करण्यासाठी लोखंडी अवजारांची वेळीच योग्य ती काळजी घेणं गरजेचं ठरतं. शेतीच्या अवजारांचं आयुष्य वाढवण्यासाठी सांगलीतील रमेश लोहार यांनी काही सोपे उपाय सांगितले आहेत.

advertisement

अवजारांची कशी काळजी घ्यावी?

पावसाळ्यात पाण्याने, चिखलाने आणि थंड हवामानाने लोखंड गंजण्याची क्रिया सुरू होते. त्यामुळे शेती उपयोगी अवजारे खराब होऊ लागतात. या शेती अवजारांचे आयुष्य कमी होते. ती वापरण्या योग्य राहत नाहीत. यासाठी शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अवजाराचा वापर चिखलामध्ये केल्यानंतर ते अवजार स्वच्छ धुऊन, कापडाने पुसून घ्यावे. तसेच स्वच्छ सूर्यप्रकाश असेल तेव्हा अवजारे उन्हात ठेवावीत. खरिपाची सुखी झाल्यानंतर अवजारांना स्वच्छ करून रिपेंट करावे. अवजारांना रंग द्यावा. त्याने अवजारांचे आयुष्य वाढते, असं रमेश लोहार सांगतात.

advertisement

फक्त 5 फुटावर होता बिबट्या, रेडकाचा जीव कसा वाचवला, शेतकऱ्यानं सांगितली आपबिती

पावसाळी हवामानात गंज चढण्याचा धोका

शेतीच्या मशागतीमध्ये आता ट्रॅक्टर, पॉवर ट्रेलर अशी आधुनिक यंत्र सामुग्री बरेच शेतकरी वापरू लागले आहेत. मात्र एकविसाव्या शतकातही यांत्रिक सामग्रीसह हाताने वापरावयाच्या अवजारांजा बऱ्याच प्रमाणात वापर होताना दिसतो. ही लोखंडी अवजारे पावसाळी हवामानाने आणि चिखलाने खराब होतात. मानवी श्रम वाचवणाऱ्या अवजारांची काळजी घेणे आणि आयुष्य वाढवणे गरजेचे ठरते. त्यामुळे ट्रॅक्टरच्या अवजारांना देखील वापरानंतर योग्य ती डागडुजी करून ठेवावे. तसेच चिखल लागल्यास ती धुवून साफ करून ठेवावीत.

advertisement

दरम्यान, शेतकऱ्यांना शेतीकाम सुलभ करण्यासाठी शेतीपुरक अवजारांची आवश्यकता असते. ही अवजारे महागडी असतात. त्यामुळे त्यांची योग्य ती काळजी घेऊन होणारा अधिकचा खर्च टाळता येऊ शकतो.

मराठी बातम्या/कृषी/
शेती अवजारे गंजण्याचा धोका, मशागत केल्यावर कशी घ्यावी काळजी?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल