बीड : मराठवाड्यामध्ये दिवसेंदिवस राजमा या पिकाचे महत्त्व वाढत चाललेलं आहे. या पिकाच्या माध्यमातून कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त नफा कसा मिळवायचा यासाठी हे पीक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. खास करून तुम्ही हे पीक दिवाळीनंतर कमीत कमी क्षेत्रामध्ये याची लागवड करू शकता. बीडमधील शेतकरी विलास जाधव यांनी राजमा पिकांची लागवड केली असून यामधून ते लाखोंची कमाई करत आहेत.
advertisement
शेतकरी विलास जाधव मागील तीन वर्षांपासून शेतामध्ये एक एकर एवढ्या क्षेत्रात राजमा पिकाची लागवड करत आहेत. राजमा या पिकाची लागवड करण्याआधी विलास जाधव पारंपरिक शेती करत असतं. परंतु पारंपरिक शेतीच्या माध्यमातून फारसं काही उत्पन्न मिळत नव्हतं. उत्पन्न मिळत नसल्याने काय करावं म्हणून त्यांच्या डोळ्यासमोर अनेक प्रश्न होते. त्यांना त्यांच्या मित्रांनी सल्ला दिल्यानंतर त्यांनी राजमा या पिकाची लागवड करण्यास सुरुवात केली.
5 एकरात मिळत नाही, तेवढं उत्पन्न 18 गुंठ्यात; मिरची शेतीतून शेतकरी कसा झाला मालामाल?
रब्बी हंगामामध्ये या पिकाची लागवड करण्यास त्यांना सल्ला मिळाला होता. त्याप्रमाणे त्यांनी हे पीक आपल्या शेतामध्ये घेण्यास सुरुवात केली. या माध्यमातून त्यांना अगदी चांगलं उत्पन्न देखील मिळू लागलं. आणि पुढे पारंपरिक पिकांपेक्षा काहीतरी वेगळे पीक घेतलेलं परडेल असा त्यांचा विचार बदलू लागला आणि त्यांनी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्यास सुरुवात केली.
सुरुवातीला त्यांनी या पिकाची लागवड फक्त 10 गुंठ्यांमध्ये केली होती. परंतु 10 गुंठे एवढ्या क्षेत्रामध्ये त्यांना जास्त उत्पन्न मिळालं आणि त्यांनी या पिकाला कमाईचे प्रमुख स्त्रोत म्हणून पसंती दिली. खरंतर आजवर अनेक शेतकऱ्यांनी कमाईचा प्रमुख स्त्रोत म्हणून या पिकाला पसंती दिलेली आहे.
इतर पिकांच्या तुलनेमध्ये हे पीक कमीत कमी क्षेत्र आणि कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देणारे पीक आहे. मला या पिकाच्या माध्यमातून 75 ते 90 दिवसांच्या कालावधीमध्ये कमीत कमी 2 लाखांपर्यंतचा नफा होतो, असं विलास जाधव यांनी सांगितलं.