काळ्या बटाट्याची वैशिष्ट्ये : मल्टी-लेअर शेतीचे जनक म्हणून प्रसिद्ध असलेले आकाश चौरसिया काळ्या बटाट्याची शेती करतात. ते सांगतात की, "काळ्या बटाट्याची मूळ लागवड दक्षिण अमेरिकेतील अँडीज पर्वतरांगांमध्ये होते. ही वन्य ट्युबर प्रकारातील पिके आहेत. हे पीक तीन महिन्यांत तयार होते. या बटाट्याचा वरचा भाग काळा असतो, तर आतील भाग गर्द जांभळा असतो. चवीला हा बटाटा सामान्य बटाट्यासारखा असतो. परंतु हृदयाचे आरोग्य, मधुमेह आणि रक्तातील लोहाच्या कमतरतेसाठी हा बटाटा औषधी ठरतो.
advertisement
लागवड पद्धत : काळ्या बटाट्याचे अधिक चांगले उत्पादन मिळवण्यासाठी चिकणमातीच्या रेतीमिश्रित जमिनीत लागवड केली जाते. जमिनीत 100 किलो चुना डस्ट आणि 50 किलो कडुलिंबाची पावडर किंवा 200 किलो कडुलिंबाच्या पानांचे मिश्रण टाकून शेत नांगरून भुसभुशीत करावे. लागवडीसाठी प्रति एकर 8 ते 10 क्विंटल बियाण्यांची गरज भासते. 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर हा काळ योग्य लागवडीसाठी आहे. हे थंड हवामानात येणारे पीक आहे. साधारणपणे प्रति एकर 100 क्विंटल उत्पादन मिळते. बाजारात हा बटाटा सहजपणे 40 ते 50 रुपये प्रति किलो दराने विकला जातो.
खताचे व्यवस्थापन : खुल्या शेतात एकापाठोपाठ एक ओळीमध्ये एक फूट रुंद मळणी करून 8 ते 9 इंच अंतरावर आणि अर्ध्या फूट खोलीच्या सरी बनवून लागवड करावी. खुल्या शेतात बटाटा प्लांटरचाही वापर करता येतो. मल्टी-लेअर शेतीमध्ये चार फूट रुंद बेडवर तीन ओळीमध्ये 8 ते 9 इंच अंतरावर आणि 2.5 ते 3 इंच खोलीत लागवड करावी. उत्तम उत्पादनासाठी प्रति एकर 15 टन कुजलेले शेणखत, 600 किलो जैविक पोटॅश आणि 3 टन वर्मा फॉस किंवा फॉस्फो कंपोस्ट हे संतुलित सेंद्रिय खत म्हणून वापरावे. लागवडीनंतर 21 दिवसांनी मटक्या खताचे द्रावण पाण्यात मिसळून 10 ते 15 दिवसांच्या अंतराने देणे आवश्यक आहे.
