करमाड येथे दुग्ध व्यावसायिक संदीप उकर्डे यांच्याकडे जाफर 14 म्हशी आहेत. लहान - मोठे एकूण 34 जनावरे त्यांच्याकडे आहेत. सकाळी 5 वाजल्यापासून ते कामाला सुरुवात करतात. शेण काढणे, गोठ्याची साफसफाई करणे, म्हशींना ढेप आणि चारा खायला, हे झाल्यानं नंतर दूध काढणे आणि 10 वाजता सर्व जनावरांना पाणी प्यायला देणे, यासारखी कामे दिवसभर सुरू असतात. दिवसाला सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन्ही वेळेला 140 लिटरच्या जवळपास दूध निघते.
advertisement
पारंपरिक पिकांना दिला फाटा, शेतात केली टोमॅटो लागवड, उत्पन्न मिळालं लाखांत! Video
म्हशींना खाद्य काय?
जाफर म्हशींना योग्य आणि संतुलित खाद्य देणे त्यांच्या आरोग्यासाठी तसेच दूध उत्पादन वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. ग्रामीण भागात पारंपारिक पद्धतीने म्हशींना सुग्रास, ढेप आणि मका यांचे सेवन दिले जाते. सुग्रास म्हणजे हिरवा चारा – नेपिअर गवत, ज्वारी, बाजरी, मका किंवा अंजीर गवत यांचा यात समावेश होतो. या हिरव्या चाऱ्यात प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजे मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे म्हशींचे पचन सुधारते, शरीराला पोषण मिळते आणि दूध उत्पादनावर सकारात्मक परिणाम होतो.
दुग्ध व्यवसाय कमाईचे साधन म्हणून चांगला आहे. या व्यवसायाला सर्व शेतकऱ्यांनी करायला हवे, मात्र यामध्ये स्वतःला मेहनत घ्यावी लागते, तेव्हा नफा देखील चांगल्या प्रमाणात मिळतो. तसेच नवीन शेतकऱ्यांना म्हशी घेऊन दूध व्यवसाय करायचा झाल्यास सुरुवातीला दोन जनावरांपासून सुरुवात करावी. त्यामध्ये स्थिर झाल्यास आणखी जनावरांची वाढ करता येत असल्याचे उकर्डे सांगतात.