शेतकरी ओळखपत्र म्हणजे काय?
शेतकरी ओळखपत्र ही शेतकऱ्यांची आधार कार्ड-आधारित अद्वितीय डिजिटल ओळखपत्र आहे जी राज्य भूमी अभिलेख प्रणालीशी सक्रियपणे जोडलेली आहे, म्हणजेच शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदींमध्ये बदल झाल्यावर शेतकरी ओळखपत्र आपोआप अपडेट होईल. या ओळखपत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योजनांचा लाभ घेता येणार आहे.
शेतकरी ओळखपत्राचे फायदे काय आहेत?
1) शेतकरी ओळखपत्र हे कृषी क्षेत्राच्या डिजिटल परिवर्तनाचा एक महत्त्वाचा भाग आहे.
advertisement
2) शेतकरी ओळखपत्र हे शेतकऱ्यांची पडताळणी पात्रता स्थापित करते. यामुळे शेतकऱ्यांना वारंवार केवायसी करण्याच्या त्रासातून मुक्तता मिळण्याची अपेक्षा आहे.
3) शेतकरी ओळखपत्रासाठी नोंदणी केल्यानंतरच, भविष्यात शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे.
4) शेतकरी नोंदणीनंतर, शेतकऱ्यांना डिजिटल ओळखपत्र मिळेल.
5) शेतकरी ओळखपत्राद्वारे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी चांगल्या योजना आखता येणार आहेत.
6) शेतकरी ओळखपत्र असल्यास बँकेकडून कर्ज घेण्यास मदत होऊ शकणार आहे.
7) खते, बियाणे आणि कृषी उपकरणे खरेदी करण्यासाठी अनुदानाची सुविधा दिली जाणार आहे.