नक्षत्रवाडी येथे नोव्हेंबर 2024 मध्ये पपई फळ बागेची लागवड करण्यात आली. यंदाच्या जुलैमध्ये पपई काढणीला सुरुवात होणार होती. मे महिन्यापासून सारखा पाऊस आतापर्यंत सुरूच आहे. 4 महिने जमिनीमध्ये वापसा होईल अशी परिस्थितीच नव्हती. पाण्याचा अतिरेक झाडांवर जास्त प्रमाणात झाला त्यामुळे पाने पिवळी पडली. पपई झाडांचा पाला खराब झाल्यामुळे फळाची गुणवत्ता ढासळली त्यामुळे व्यापारी देखील बागेकडे फिरकून बघायला तयार नाही, अशी प्रतिक्रिया देखील वीर यांनी दिली.
advertisement
पपई फळाची परतीच्या पावसामुळे गोडीच गेली. जिथे दोन एकर मध्ये 12 ते 13 लाख रुपयांचे उत्पन्न निघणे अपेक्षित होते. तिथे मात्र 1 लाख रुपये उत्पन्न मिळाले आणि खर्च 3 लाख रुपये झाला यामुळे पूर्णतः नुकसान झाले/ आतापर्यंत वीर यांच्या शेतात कुठल्याही प्रशासकीय किंवा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली नाही यानंतर मात्र शासन यावर काय पाऊल उचलते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.





