शेतकऱ्यांच्या मुलींसाठी वेगळी वाट
सुरुवातीला ही योजना केवळ संघाच्या सभासद शेतकऱ्यांसाठी मर्यादित होती. मात्र वाढता प्रतिसाद आणि योजनेचा सामाजिक व आर्थिक लाभ लक्षात घेऊन आता ही योजना महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या मुलींसाठी खुली करण्यात आली आहे. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे सरकारी अनुदानावर अवलंबून न राहता शेतीतील नैसर्गिक संसाधनांचा वापर करून भविष्यात मोठा आर्थिक आधार उभा करणे.
advertisement
काय आहेत चंदनकन्या योजनेचे फायदे?
या योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्याला सर्व प्रकारची मदत नि:शुल्क दिली जाणार आहे. मुलीच्या नावाने लागवडीसाठी २० चंदनाची रोपे जिल्हा स्तरावर उपलब्ध करून दिली जाते. चंदन लागवड कशी करावी, कोणत्या जमिनीत योग्य ठरेल, पाणी व खत व्यवस्थापन कसे असावे याचे सविस्तर मार्गदर्शन संघाकडून केले जाईल.
लागवडीनंतर एक वर्षाने चंदनाच्या झाडांची नोंद महसूल कागदपत्रांमध्ये करून घेण्यासाठीही मदत केली जाणार जाते. पुढे झाडे परिपक्व झाल्यानंतर त्यांची तोड, वाहतूक परवाना काढणे आणि विक्री प्रक्रियेत मार्गदर्शन अशी सर्व कामे संघ स्वतः पाहणार पाहते.
अशी आहे “चंदनकन्या” योजनेची रचना
१ ते १० वर्षे वयोगटातील मुलगी असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेताच्या बांधावर किंवा मोकळ्या जागेत फक्त २० चंदनाची झाडे लावायची आहेत. ही झाडे सुमारे १२ वर्षे सांभाळली तर त्या कालावधीनंतर त्यातून मोठे आर्थिक उत्पन्न मिळू शकते. अंदाजे १२ वर्षांनंतर या २० चंदनाच्या झाडांमधून १५ ते २० लाख रुपयांपर्यंत रक्कम मिळण्याची शक्यता असते. ही रक्कम मुलीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी मोठा आधार ठरू शकते.
नोंदणी प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे
या योजनेत सहभागी होण्यासाठी मुलीचे तसेच वडिलांचे आधार कार्ड आवश्यक आहे. अर्जासोबत ११०० रुपये इतके सहभाग शुल्क भरून नोंदणी करता येते. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपले नाव तसेच मुलगी, पुतणी, भाची किंवा नातीचे पूर्ण नाव ७०३८४४३३३३ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवावे.
