TRENDING:

घरबसल्या 2 लाखांपर्यंत पीक कर्ज कसं मिळवायचे? प्रक्रियेबद्दलची A TO Z माहिती

Last Updated:

Agriculture News : शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळवताना येणाऱ्या अडचणी, विलंब आणि बँकांच्या वारंवार फेऱ्या कमी करण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Farmer Loan
Farmer Loan
advertisement

मुंबई : शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळवताना येणाऱ्या अडचणी, विलंब आणि बँकांच्या वारंवार फेऱ्या कमी करण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीयीकृत बँकांकडून दिल्या जाणाऱ्या पीक कर्जासाठी आता ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा अधिकृतपणे उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘जनसमर्थ पोर्टल’च्या माध्यमातून शेतकरी घरबसल्या पीक कर्जासाठी अर्ज करू शकणार असून, या प्रक्रियेमुळे कर्जवाटप अधिक पारदर्शक आणि जलद होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

advertisement

नवीन पोर्टल काय आहे?

जनसमर्थ पोर्टल हे केंद्र सरकारचे एक एकत्रित डिजिटल व्यासपीठ असून, विविध सरकारी कर्ज योजनांचा लाभ एका ठिकाणी मिळावा, या उद्देशाने ते विकसित करण्यात आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज मिळू शकणार आहे. विशेष म्हणजे, या कर्जासाठी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना आता बँकेत प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची गरज भासणार नाही.

advertisement

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

जनसमर्थ पोर्टलवर पीक कर्जासाठी अर्ज करताना काही महत्त्वाची कागदपत्रे अनिवार्य असणार आहेत. यामध्ये शेतकरी आयडी असणे आवश्यक आहे. यासोबतच आधारकार्ड, आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर, संबंधित बँकेचे पासबुक आणि पॅनकार्ड ही कागदपत्रे अर्ज प्रक्रियेसाठी आवश्यक असतील. सर्व माहिती ऑनलाईन भरल्यामुळे कागदपत्रांची पडताळणीही डिजिटल पद्धतीने होणार आहे.

advertisement

शेतकऱ्यांना होणारे फायदे

या ऑनलाईन प्रणालीमुळे शेतकऱ्यांना अनेक प्रकारचे फायदे मिळणार आहेत. कर्जासाठी बँकांच्या चकरा माराव्या लागणार नाहीत. कागदपत्रांच्या त्रुटी किंवा अपूर्ण माहितीच्या कारणावरून अर्ज वारंवार नाकारले जाण्याचे प्रमाण कमी होईल. तसेच कर्ज मंजुरीची प्रक्रिया कमीत कमी कालावधीत पूर्ण होण्यास मदत होणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या संपूर्ण ऑनलाईन प्रक्रियेसाठी कोणतेही शासकीय शुल्क आकारले जाणार नाही. पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज सहज उपलब्ध होऊ शकणार आहे.

advertisement

पैसे मागितल्यास तक्रार करण्याचे आवाहन

प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, जनसमर्थ पोर्टलवरील अर्ज प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. अर्ज भरण्यासाठी किंवा कर्ज मंजुरीसाठी कोणीही पैसे मागितल्यास त्वरित जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करावी. अशा तक्रारींची गंभीर दखल घेतली जाणार असून, संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.

जिल्हा व तालुकास्तरावर विशेष मोहीम

या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा आणि तालुका पातळीवर विशेष मोहीम राबवली जाणार आहे. तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी आणि जिल्हा अग्रणी बँक प्रतिनिधी यांच्या समन्वयाने वेळापत्रक तयार करण्यात येणार आहे. तसेच सेतू केंद्र, महा ई-सेवा केंद्र आणि ग्राहक सेवा केंद्रांनाही या प्रक्रियेत सहभागी करून घेतले जाणार आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
600 महिलांना मिळाला रोजगार, मेळघाटमध्ये कसा बनवला जातोय च्यवनप्राश? Video
सर्व पहा

मराठी बातम्या/कृषी/
घरबसल्या 2 लाखांपर्यंत पीक कर्ज कसं मिळवायचे? प्रक्रियेबद्दलची A TO Z माहिती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल