TRENDING:

तुमच्या गावात कुणा कुणाला मिळणार PM Kisan चे 2000 रु? 2 मिनिटांत करा चेक

Last Updated:

PM Kisan Yojana : राज्यातील शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 22 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. केंद्र सरकारकडून हा हप्ता लवकरच वितरित होण्याची शक्यता असून, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : राज्यातील शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 22 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. केंद्र सरकारकडून हा हप्ता लवकरच वितरित होण्याची शक्यता असून, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. मात्र हप्ता मिळण्याआधी प्रत्येक लाभार्थ्याने आपले नाव यादीत आहे की नाही, याची खात्री करणे अत्यंत आवश्यक ठरत आहे.
pm kisan yojana
pm kisan yojana
advertisement

पीएम किसान योजना काय आहे?

पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून, पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम तीन समान हप्त्यांत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. शेतीच्या वाढत्या खर्चात ही मदत अनेक शेतकरी कुटुंबांसाठी दिलासादायक ठरत आहे.

advertisement

22व्या हप्त्याबाबत शेतकऱ्यांची प्रतीक्षा

योजनेच्या 22 व्या हप्त्याबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर झालेली नसली, तरी लवकरच हा हप्ता जमा होईल, असे संकेत दिले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आताच आवश्यक कागदपत्रे आणि माहिती तपासून ठेवणे महत्त्वाचे आहे.

गावनिहाय लाभार्थी यादी कशी पाहायची?

शेतकऱ्यांना त्यांच्या गावातील लाभार्थी यादी सहजपणे ऑनलाइन पाहता येते. यासाठी सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी. होमपेजवर “लाभार्थी यादी” (Beneficiary List) या पर्यायावर क्लिक करावे. यानंतर राज्य, जिल्हा, तालुका, ब्लॉक आणि गावाची माहिती निवडावी. सर्व माहिती भरल्यानंतर “रिपोर्ट मिळवा” या पर्यायावर क्लिक करताच तुमच्या गावातील सर्व पात्र लाभार्थ्यांची संपूर्ण यादी स्क्रीनवर दिसून येईल.

advertisement

लाखो शेतकऱ्यांची नावे यादीतून का वगळली?

मागील काही महिन्यांत देशभरात मोठ्या प्रमाणावर लाभार्थी यादीचे पुनरावलोकन करण्यात आले. या प्रक्रियेत लाखो शेतकऱ्यांची नावे यादीतून काढून टाकण्यात आली. यामागे अनेक कारणे समोर आली आहेत.

नियमांचे उल्लंघन ठरले कारणीभूत

एका कुटुंबातील पती आणि पत्नी दोघेही स्वतंत्रपणे या योजनेचा लाभ घेत असल्याची अनेक प्रकरणे आढळली. नियमांनुसार एका कुटुंबाला एकच लाभ मिळू शकतो. त्यामुळे अशा लाभार्थ्यांची नावे वगळण्यात आली. तसेच काही ठिकाणी अल्पवयीन मुलांच्या नावावर हप्ते जमा होत असल्याचे आढळून आले, हेही नियमबाह्य ठरले.

advertisement

ई-केवायसी अपूर्ण असल्याने अडचण

मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. आधार क्रमांक, बँक खाते आणि जमिनीच्या नोंदी यामध्ये तफावत असल्यास लाभ थांबवण्यात आला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी हप्त्यापासून वंचित राहिले आहेत.

हप्ता मिळवण्यासाठी काय करावे?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
बदलापूरचा नवसाला पावणारा बाप्पा, थेट शिवकाळाशी कनेक्शन अन् पेशव्यांचं दान, Video
सर्व पहा

22 व्या हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी पूर्ण आहे का, बँक खाते आधारशी जोडले आहे का आणि आपले नाव लाभार्थी यादीत आहे का, याची तातडीने खात्री करून घ्यावी. आवश्यक दुरुस्त्या वेळेत केल्यास पुढील हप्त्याचा लाभ निश्चितपणे मिळू शकतो.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
तुमच्या गावात कुणा कुणाला मिळणार PM Kisan चे 2000 रु? 2 मिनिटांत करा चेक
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल