जालना जिल्ह्यातील दहिफळ येथील महादेव काळे मागील अनेक वर्षांपासून केळीची शेती करतात. परंतु मागील काही वर्षांत दुष्काळी परिस्थिती असल्याने त्यांनी ही शेती करणं बंद केलं होतं. मात्र पाण्याचा सोर्स उपलब्ध झाल्याने त्यांनी मागील वर्षी जुलै महिन्यामध्ये नाशिक येथून 9 रुपये प्रतिरोप याप्रमाणे केळीच्या 1550 रोपांची पाच बाय पाच या पद्धतीने लागवड केली. जे नाईन या जातीचं वान आपल्या शेतामध्ये लावले.
advertisement
Farmer Success Story: सालगडी बनला मालक, द्राक्ष शेतीतून पालटलं नशीब, आता कमाई पाहाच!
यानंतर 30 गुंठे क्षेत्रामध्ये दोन ट्रॉली शेणखत वापरले. त्याच पद्धतीने पोटॅश, सल्फर आणि इतर रासायनिक खतांच्या मात्रा योग्य प्रमाणात दिल्या. ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाणी आणि विद्राव्य खतांचे योग्य व्यवस्थापन केलं. सध्या त्यांची केळीची बाग ही 10 महिन्यांची झाली असून केळी मधून घड निघण्यास सुरुवात झाली आहे.
केळीला सध्या बाजारात 2 हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास दर मिळत आहे. आपण 50 किलोचा एक घड गृहीत धरला तर 600 ते 700 क्विंटल केळीचे उत्पन्न 30 गुंठ्यांमध्ये अपेक्षित आहे. याला बाजारात 1500 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला तरी देखील 9 ते 10 लाखांचं उत्पन्न होईल, अशी अपेक्षा महादेव काळे यांनी लोकल 18 शी बोलताना व्यक्त केली.