अर्ज प्रक्रिया
तुम्हाला योजनेचा लाभ घेण्यासाठी SOLAR MTSKPY या पोर्टलला भेट द्यावी लागेल. त्यात सुविधा या बटणावर क्लिक करून अर्ज भरावा लागेल. अर्जामध्ये माहिती भरावी जसे की, वैयक्तिक माहिती, रहिवासी पत्ता, जमिनीची माहिती, कृषी तपशील, बँक तपशील, इत्यादी अर्ज भरल्यानंतर सबमीट करावा त्यानंतर त्याची तुम्हाला पोहोच पावती मिळेल. अर्ज भरताना काही अडचण आल्यास तालुका स्तरावरील महावितरण उपविभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा लागेल
advertisement
लाभार्थी शेतकऱ्याची निवड कशी होते?
शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर त्या अर्जाची पडतळणी केली जाते. ज्यामध्ये अर्जदाराच्या जमीन क्षेत्रावर कृषी पंपाचे निकष ठरवले जातात जसे की,
तुमची जर 2.5 एकरपर्यंत शेतजमीन असेल तर तुम्हाला 3 अश्वशक्तीचा क्षमतेचा कृषी पंप देण्यात येतो.
तसेच शेतजमीन 2.5 ते 5 एकरपर्यंत असेल तर 5 अश्वशक्ती क्षमतेचा कृषी पंप देण्यात येतो.
तुमची 5 किंवा 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल तर 7.5 अश्वशक्ती क्षमतेचा कृषी पंप देण्यात येतो.
शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केल्यानंतर तुमचा लाभारतही क्रमांक पोर्टलवर टाकून तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती तपासू शकता. तसेच तुम्हाला तिथे रक्कम भरण्याचा पर्याय देखील उपस्थित करून दिलेला असतो. ती रक्कम भरल्यानंतर तुम्हाला कृषी पंपाची कंपनी निवडावी लागते. मग त्यानंतर संबंधीत कंपनीचे लोक तुमच्या विहिरीवर कृषी पंप बसवून देतात.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?
7/12 उतारा ( जलस्रोताची नोंद आवश्यक)
मालकांचा ना हरकत दाखला 200 रु स्टॅम्प पेपरवर देणे बंधनकारक
आधारकार्ड
बँक पासबूक
पासपोर्ट आकाराचा फोटो
जातीचे प्रमाणपत्र
पाण्याचा स्त्रोत डार्क झोनमध्ये असल्यास तसे प्रमाणपत्र देणे बंधनकारक