नोंदणी उपमहानिरीक्षक उदयराज चव्हाण यांनी यासंदर्भात परिपत्रक जारी केले असून, राज्य सरकारच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने यंदाच्या आर्थिक वर्षासाठी 55,000 कोटी रुपयांचे महसुली लक्ष्य निर्धारित केले आहे. मागील आर्थिक वर्षात हे उद्दिष्ट 50,000 कोटी रुपये होते.
राज्यातील महसूल आणि दस्त नोंदणीचे संख्याशास्त्र
फेब्रुवारी २०२५ पर्यंत एकूण महसूल - 48,995 कोटी रुपये
advertisement
उद्दिष्टाच्या तुलनेत महसूल - 89 टक्के पूर्ण
नोंदणीकृत दस्त संख्या - 25 लाखाहून अधिक
मार्च महिन्यातील अतिरिक्त महसूल उद्दिष्ट - 7,000 कोटी रुपये
मार्च महिन्यासाठी विशेष निर्णय
1 ते 31 मार्चदरम्यान राज्यभरातील 300+ दुय्यम निबंधक कार्यालयांची वेळ वाढवण्यात आली आहे.सध्याची वेळ ही सकाळी 9:45 ते संध्याकाळी 6:00 पर्यंत असून नवीन वेळेनुसार कार्यालये रात्री 8:00 पर्यंत सुरू राहणार आहे.
दरम्यान, नोंदणी प्रक्रियेत सुलभता यावी आणि महसूल संकलन वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे उदयराज चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. जमीन खरेदी-विक्री तसेच अन्य दस्तनोंदणी प्रक्रिया वेगवान करण्यासाठी हा बदल नागरिकांना फायदेशीर ठरेल.