TRENDING:

Gulchadi Farming : शिक्षण घेत असताना जोपासली शेतीची आवड, 10 गुंठ्यात केली गुलछडी लागवड, कमाई लाखात!

Last Updated:

शेतीची आवड असलेल्या प्रीती लोखंडे यांनी BAMS द्वितीय वर्षात शिक्षण शिकत शिकत गावाकडे असलेल्या 10 गुंठ्यात गुलछडी फुलाची लागवड केली आहे. यामधून लाखोंची कमाई झाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सोलापूर :- शेतीची आवड असलेल्या प्रीती लोखंडे यांनी BAMS द्वितीय वर्षात शिक्षण शिकत शिकत गावाकडे असलेल्या 10 गुंठ्यात गुलछडी फुलाची लागवड केली आहे. यासाठी त्यांना 30 हजार रुपयांपर्यंत खर्च आला आहे. तर एकदा लागवड केलेल्या या गुलछडी फुलापासून त्यांना 3 वर्षात 3 लाखांचा नफा मिळाला आहे. यासंदर्भात अधिक माहिती प्रीती लोखंडे यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
advertisement

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पापरी गावात राहणारी प्रीती लोखंडे या तरुणीला शेतीची आवड आहे. सोलापुरातील एका खाजगी आयुर्वेदिक महाविद्यालयात BAMS मध्ये द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. प्रीती यांना शेतीची आवड आहे त्यामुळे त्यांनी वडिलोपार्जित असलेल्या दहा गुंठ्यात गुलछडी या फुलाची लागवड केली आहे. 10 गुंठ्यात तीन वर्षांपूर्वी त्यांनी गुलछडी या फुलाची लागवड केली आहे. या लागवडीसाठी त्यांना 30 हजार रुपयांपर्यंत खर्च आला आहे. तर यापासून त्यांनी तीन वर्षांत सर्व खर्च वजा करून 3 लाखांचे उत्पन्न घेतले आहे. तर या गुलछडीची विक्री मुंबई येथील दादर मार्केट येथे केली जात आहे. सध्या गुलछडीला 40 रुपये किलो दराने भाव मिळत आहे. परंतु सण-उत्सवाच्या काळामध्ये याच गुलछडी फुलाचे दर 100 रुपये किलोपर्यंत जाते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
युद्धाचा फटका केळी उत्पादक शेतकऱ्यांना, फक्त दीड रुपये किलोने खरेदी, कांद्याला काय मिळतोय भाव?
सर्व पहा

तसेच प्रीती लोखंडे यांनी गुलछडीच्या शेतीमध्ये प्रथमतः शेडनेट मारून गुलछडीची लागवड केली आहे. यामुळे गवत काढण्यासाठी महिलांवर खुरपणी करण्यासाठी होणारा खर्च सुद्धा वाचला आहे. शिक्षण शिकत शिकत सुद्धा शेतीतून अधिकाधिक उत्पन्न घेता येते हे प्रीती लोखंडे यांनी सिद्ध करून दाखवले आहे.

मराठी बातम्या/कृषी/
Gulchadi Farming : शिक्षण घेत असताना जोपासली शेतीची आवड, 10 गुंठ्यात केली गुलछडी लागवड, कमाई लाखात!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल