वारस किंवा सहमालक असतील तर हिस्सा नक्की मिळणार
जर 7/12 उताऱ्यात वारस किंवा सहमालक म्हणून नोंद झाली असेल, तर त्या व्यक्तींना जमिनीतील हिस्सा मिळतो.
उदाहरणार्थ, जमीन वडिलोपार्जित असल्यास आणि अद्याप तिची वाटणी झाली नसेल, तर सर्व वारसांना त्या जमिनीवर समान हक्क मिळतो. अशा स्थितीत ‘इतर हक्क’ विभागात त्या सर्व वारसांची नावे दिसू शकतात. वाटणी न होईपर्यंत प्रत्यक्ष शेती कोण करतो हा वेगळा मुद्दा असला तरी, सर्व वारसांना कायदेशीर हक्क समान प्रमाणात मान्य केला जातो.
advertisement
गहाण किंवा कर्ज असेल तर केवळ आर्थिक हक्क
जर इतर हक्कात बँक, सहकारी संस्था किंवा कर्जपुरवठादार यांची नोंद दिसली, तर तो हक्क केवळ आर्थिक स्वरूपाचा असतो. उदाहरणार्थ, शेतकऱ्याने पीककर्ज घेतले आणि त्यासाठी जमीन गहाण ठेवली, तर बँकेचे नाव ‘इतर हक्क’ विभागात दिसेल. पण बँकेला जमिनीच्या उत्पन्नात थेट हिस्सा मिळत नाही. बँकेचा हक्क फक्त कर्ज फेडेपर्यंतच असतो. कर्जाची परतफेड पूर्ण झाल्यावर ही नोंद काढली जाऊ शकते.
वाटणीपूर्वी सर्व वारसांची नोंद
कधी कधी जमीन वाटणी होण्यापूर्वी ‘इतर हक्क’ विभागात सर्व वारसांची नावे दिसतात. वाटणी झाल्यानंतर संबंधित भाग स्वतंत्रपणे नोंदवला जातो. तोपर्यंत नोंद असलेल्या सर्व व्यक्ती हक्कदार मानल्या जातात.
नोंदीचे स्वरूप महत्त्वाचे
‘इतर हक्क’ विभागातील नोंदींचा अर्थ लावताना नोंद कशा प्रकारची आहे हे तपासणे अत्यावश्यक आहे. जर व्यक्ती वारस, सहमालक किंवा हक्कदार म्हणून नमूद असेल तर त्याला जमिनीच्या मिळकतीत थेट हिस्सा मिळतो. पण जर नोंद गहाण, कर्ज किंवा आर्थिक व्यवहार यासंबंधी असेल, तर ती व्यक्ती किंवा संस्था फक्त आर्थिक हक्कधारक ठरते, प्रत्यक्ष शेतीच्या उत्पन्नात त्यांचा हिस्सा नसतो.
थोडक्यात काय तर, 7/12 उताऱ्यातील ‘इतर हक्क’ नोंदींचा अर्थ सर्वांसाठी सारखा नसतो.
वारस/सहमालक - मिळकतीत थेट हिस्सा.
बँक/कर्जपुरवठादार - फक्त आर्थिक हक्क, उत्पन्नात हिस्सा नाही.
त्यामुळे, जमिनीवरील इतर हक्काचा अर्थ समजून घेण्यासाठी त्या नोंदीचे स्वरूप नीट वाचणे आणि आवश्यक असल्यास महसूल विभागाकडून पडताळणी करणे गरजेचे ठरते.