TRENDING:

Krushi Saur Pump Yojana : 'मागेल त्याला सौर कृषी पंप योजना' आहे तरी काय? पात्रता, आवश्यक कागदपत्रे, जाणून घ्या

Last Updated:

agriculture news : शेतकऱ्यांना सिंचनासाठी सौर कृषी पंप उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज देखील मागवण्यात आले आहेत. मग आता या योजनेसाठी अर्ज कसा करायचा, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, या बाबतची माहिती सविस्तरपणे जाणून घेऊ.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : शासनाकडून 'मागेल त्याला सौर कृषी पंप योजना' योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेतंर्गत शेतकऱ्यांना सिंचनासाठी सौर कृषी पंप उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज देखील मागवण्यात आले आहेत. मग आता या योजनेसाठी अर्ज कसा करायचा, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, या बाबतची माहिती सविस्तरपणे जाणून घेऊ.
'मागेल त्याला सौर कृषी पंप योजना' आहे तरी काय?
'मागेल त्याला सौर कृषी पंप योजना' आहे तरी काय?
advertisement

योजनेची वैशिष्टे काय आहेत?

1) शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत योजना आहे

2) सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ 10 टक्के रक्कम भरून सौर पॅनेल्स व कृषी पंपाचा पूर्ण संच मिळणार आहे.

3) अनुसूचित जाती - जमातींच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा 5 टक्के असणार आहे.

4) उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान जमिनीच्या क्षेत्रानुसार 3 ते 7 .5 एचपीचे पंप

advertisement

पाच वर्षांची दुरुस्ती हमी असणार आहे.

लाभार्थी निवडीचे निकष 

1) 2.5 एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास 3 अश्वशक्ती क्षमते पर्यंतचे सौर कृषीपंप, 2.51 ते 5 एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास 5 अश्वशक्ती क्षमतेचा आणि 5 एकरावरील शेतजमीन धारक शेतकऱ्यास 7.5 अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषीपंप देय राहणार आहे. तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर कृषीपंपाचे मागणी केल्यास तो अनुज्ञेय राहणार आहे.

advertisement

2) वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, विहिर, बोअरवेल यांचे मालक तसेच बारमाही वाहणारी नदी/नाले यांच्या शेजारील शेतजमीनधारक शेतकरी सुध्दा या योजनेसाठी पात्र राहणार आहे.

3) ज्या शेतकऱ्यांकडे बोअरवेल, विहिर व नदी इ. ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्त्रोत आहे याची खात्री महावितरणद्वारे करण्यात येईल. तथापि, जलसंधारण कामाच्या पाणी जिरविण्याच्या पाणीसाठ्यामधून पाणी उपसण्यासाठी सदर पंप वापरता येणार नाहीत.

advertisement

4) अटल सौर कृषी पंप योजना-1 , अटल सौर कृषी पंप योजना-2 व मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना या योजनांचा लाभ न घेतलेले लाभार्थी शेतकरी देखील या अभियानांतर्गत लाभास पात्र असणार आहेत.

आवश्यक कागदपत्रे 

7/12 उतारा ( जलस्रोताची नोंद आवश्यक)

मालकांचा ना हरकत दाखला 200 रु स्टॅम्प पेपरवर देणे बंधनकारक

advertisement

आधारकार्ड

बँक पासबूक

पासपोर्ट आकाराचा फोटो

जातीचे प्रमाणपत्र

पाण्याचा स्त्रोत डार्क झोनमध्ये असल्यास तसे प्रमाणपत्र देणे बंधनकारक

अर्ज कसा करावा ?

तुम्हाला योजनेचा लाभ घेण्यासाठी SOLAR MTSKPY या पोर्टलला भेट द्यावी लागेल. त्यात सुविधा या बटणावर क्लिक करून अर्ज भरावा लागेल. अर्जामध्ये माहिती भरावी जसे की, वैयक्तिक माहिती, रहिवासी पत्ता, जमिनीची माहिती, कृषी तपशील, बँक तपशील, इत्यादी अर्ज भरल्यानंतर सबमीट करावा त्यानंतर त्याची तुम्हाला पोहोच पावती मिळेल. अर्ज भरताना काही अडचण आल्यास तालुका स्तरावरील महावितरण उपविभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा.

मराठी बातम्या/कृषी/
Krushi Saur Pump Yojana : 'मागेल त्याला सौर कृषी पंप योजना' आहे तरी काय? पात्रता, आवश्यक कागदपत्रे, जाणून घ्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल