मराठवाड्यातील महत्त्वाची बाजार समिती असलेल्या जालना शहरातील नवीन मोढ्यामध्ये दररोज 4 ते 5 हजार क्विंटल सोयाबीनची आवक होत आहे. सोयाबीनमध्ये आर्द्रतेचे प्रमाण कमी असल्याने दर हे 3100 ते 4300 च्या दरम्यान आहेत. आगामी काळामध्ये सोयाबीनची आवक 10 हजार क्विंटलपासून ते 35 ते 36 हजार क्विंटलपर्यंत पोहोचू शकते, असं जालन्यातील व्यापाऱ्यांनी सांगितलं.
advertisement
सध्या 10 ते 12 टक्के आर्द्रता असलेले सोयाबीन 4200 ते 4300 रुपये प्रतिक्विंटल या दराने विक्री होत आहे. तर 20 ते 25 टक्के आर्द्रता असलेले सोयाबीन साडेतीन ते 4 हजार रुपये प्रति क्विंटल या दरम्यान विक्री होत आहे. आगामी काळात वाळलेल्या सोयाबीनला 5 हजार रुपयांपर्यंत दर मिळू शकतो, अशी शक्यता व्यापाऱ्यांनी लोकल 18 शी बोलताना व्यक्त केली.
त्याचबरोबर शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीला आणताना ते वाळवून आणावे जेणेकरून त्यांना चांगला भाव मिळेल आणि व्यापाऱ्यांनाही सोयाबीन खरेदी करताना भावाचा अंदाज येईल, असं आवाहन व्यापारी सुदर्शन भुंबर केला यांनी केलं आहे.