Solapur Flood : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रसेवा समूहाचा पुढाकार, राबवला मदतीचा मोठा उपक्रम, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Niranjan Sherkar
Last Updated:
सोलापूर जिल्ह्यात अलीकडेच झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. धायरी गावातील नागरिकांनी एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात मानवतावादी मदतीचा उपक्रम राबवला आहे.
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अलीकडेच झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पूरग्रस्त भागातील शेतकरी, ग्रामस्थ आणि गुरेढोरे मोठ्या अडचणीत सापडले आहेत. या संकटाच्या काळात पुण्यातील राष्ट्रसेवा समूह आणि धायरी गावातील नागरिकांनी एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात मानवतावादी मदतीचा उपक्रम राबवला आहे. याबाबतची अधिक माहिती स्मिता पोकळे यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
मागील काही दिवसांत मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यात महापुराने थैमान घातले होते. या महापुराच्या फटक्यामुळे मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. शेतातील पिकासोबतच जनावरांना देखील ह्या महापुराचा फटका बसला. सोलापूर जिल्ह्यात सीना नदीला आलेल्या महापुरामुळे शेतीचे नुकसान, घरांची पडझड झाल्यामुळे अनेक जणांचे संसार उघड्यावर आले.
advertisement
राष्ट्रसेवा समूहाच्या पुढाकाराने धायरी परिसरातील नागरिकांकडून अन्नधान्य, कपडे, औषधे, तसेच गुरांच्या चाऱ्याचे मोठे प्रमाण गोळा करण्यात आले. या सर्व वस्तू सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात पाठवण्यात आल्या. अनेक नागरिकांनी आपला वेळ देऊन मदतसामग्री वर्गीकरण, पॅकिंग आणि वाहतूक यासाठी योगदान दिले.
यावेळी स्मिता पोकळे म्हणाल्या की, अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतकऱ्यांना फूल न फुलाची पाकळी म्हणून आम्ही मदत करण्याचे ठरवले. यात जनावरांना लागणारा चारा, औषधे, संसार उपयोगी समान या सर्व गोष्टी समाविष्ट आहेत. धायरी गावातील प्रत्येक नागरिकांकडून विविध स्वरूपात मदत देण्यात आल्यामुळे सर्व शक्य झाले असते तर त्यांनी सांगितलं.
advertisement
राष्ट्रसेवा समूहाचे प्रमुख कार्यकर्ते म्हणाले की, मानवी संकटाच्या काळात समाज म्हणून एकत्र उभे राहणे हीच खरी राष्ट्रसेवा आहे. पुण्यातील लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हे समाजातील संवेदनशीलतेचे प्रतीक आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
October 03, 2025 4:16 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Solapur Flood : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रसेवा समूहाचा पुढाकार, राबवला मदतीचा मोठा उपक्रम, Video