Grahan 2026: नवीन वर्षातील पहिलं ग्रहण या तारखेला; 2026 मधील सूर्यग्रहण-चंद्र ग्रहणांच्या तारखा
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Grahan 2026: नवीन वर्ष 2026 मध्ये एकूण 4 ग्रहणे लागणार आहेत. यामध्ये दोन सूर्य ग्रहणे आणि दोन चंद्र ग्रहणांचा समावेश आहे. ग्रहणाबद्दल लोकांमध्ये नेहमीच उत्सुकता असते, मात्र धार्मिक दृष्टिकोनातून ग्रहण पाहणे अशुभ मानले जाते. ग्रहणाच्या वेळी...
मुंबई : काही तासातच आता नवीन वर्ष 2026 सुरू होणार आहे. नवीन वर्ष सुरू होताना त्यामध्ये किती ग्रहणे असतील याची उत्सुकता अनेकांना असते. नवीन वर्ष 2026 मध्ये एकूण 4 ग्रहणे लागणार आहेत. यामध्ये दोन सूर्य ग्रहणे आणि दोन चंद्र ग्रहणांचा समावेश आहे. ग्रहणाबद्दल लोकांमध्ये नेहमीच उत्सुकता असते, मात्र धार्मिक दृष्टिकोनातून ग्रहण पाहणे अशुभ मानले जाते. ग्रहणाच्या वेळी राहू आणि केतू सूर्य तसेच चंद्राला कमकुवत करतात. यामुळे ग्रहण काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. वर्ष 2026 मध्ये ग्रहणे कधी लागणार आहेत, याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
2026 मधील पहिले ग्रहण कधी?
नवीन वर्षातील पहिले ग्रहण 17 फेब्रुवारी 2026 रोजी लागेल. हे सूर्य ग्रहण असेल. हे ग्रहण दक्षिण आफ्रिका, दक्षिण अर्जेंटिना आणि अंटार्क्टिकामध्ये दिसून येईल. भारतातून हे ग्रहण दिसणार नाही, त्यामुळे याचा सूतक काळ भारतात पाळण्याची आवश्यकता नसेल.
2026 मधील दुसरे ग्रहण कधी आहे?
वर्षातील दुसरे ग्रहण 3 मार्च 2026 रोजी लागेल. हे चंद्र ग्रहण असेल. विशेष म्हणजे हे चंद्र ग्रहण भारतासह आशियातील जवळपास सर्वच भागांत दिसून येईल. याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, उत्तर आणि दक्षिण अमेरिकेतही हे ग्रहण दिसेल. भारतात हे ग्रहण दिसणार असल्यामुळे याचा सूतक काळ मान्य असेल आणि धार्मिक नियम पाळावे लागतील.
advertisement
2026 मधील तिसरे ग्रहण कधी आहे?
वर्षातील तिसरे आणि दुसरे सूर्य ग्रहण 12 ऑगस्ट 2026 रोजी लागेल. हे सूर्य ग्रहण आर्क्टिक, ग्रीनलँड, आइसलँड, स्पेन, रशिया आणि पोर्तुगालमध्ये दिसून येईल. भारतातून हे ग्रहण दिसणार नसल्यामुळे याचा सूतक काळ भारतात मान्य नसेल.
2026 मधील चौथे ग्रहण कधी आहे?
वर्षातील शेवटचे आणि चौथे ग्रहण 28 ऑगस्ट 2026 रोजी लागेल. हे वर्षातील दुसरे चंद्र ग्रहण असेल. हे ग्रहण उत्तर आणि दक्षिण अमेरिका, युरोप आणि आफ्रिकेच्या काही भागांत दिसेल. भारतातून हे ग्रहण दिसणार नाही, त्यामुळे याचा सूतक काळ भारतात पाळला जाणार नाही.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 31, 2025 9:19 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Grahan 2026: नवीन वर्षातील पहिलं ग्रहण या तारखेला; 2026 मधील सूर्यग्रहण-चंद्र ग्रहणांच्या तारखा











