TRENDING:

सोयाबीनला जेमतेम भाव; खर्चही निघत नाहीये, अमरावतीमधील शेतकरी संतप्त, VIDEO

Last Updated:

amravati soybean farmers - अमरावती जिल्ह्यांत सोयाबीनचे भरपूर नुकसान झाले. शेतकऱ्यांना सोयाबीनला चांगला भाव मिळेल अशी आशा होती. पण, जेमतेम भाव मिळत असल्याने शेतकरी नाराज झाले आहेत. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रगती बहुरुपी, प्रतिनिधी
advertisement

अमरावती - अमरावती जिल्ह्यांत यावर्षी सोयाबीन पिकाचे भरपूर नुकसान झाले. काही शेतकऱ्यांना एकरी 1 क्विंटलचा सुद्धा उतार लागल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर शेतकऱ्यांना सोयाबीनला योग्य भाव मिळेल, अशी आशा होती. पण शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव सुद्धा कमी मिळत आहे. हमीभाव 4892 आहे. मात्र, असे असतानाही शेतकऱ्यांच्या हातात 4 हजार रुपयांच्या खाली पैसे येत आहे. शेतकऱ्यांच्या सोयाबीनची क्वालिटी चेक करून त्यांना भाव दिला जात आहे . त्यामुळे शेतकरी आता खूप संतापले आहे. याचबाबत लोकल18 चा स्पेशल रिपोर्ट.

advertisement

अमरावतीमधील अचलपूर येथील शेतकऱ्यांशी सोयाबीन उत्पन्नाबाबत लोकल18 ने चर्चा केली. तेव्हा तेथील शेतकरी सतिश रहाटे सांगतात की, 4 एकरमध्ये 16 क्विंटल सोयाबीन झाले. मार्केटमध्ये आणले तेव्हा त्याला 3560 रुपये इतका भाव सांगत होते. मग मी ऑनलाईन नोंदणी केली आणि सरकारी भावाने सोयाबीन विकायचा विचार केला. तिथे सुद्धा त्यांनी सोयाबीन चेक केली आणि आर्द्रता जास्त आहे असे सांगून माल परत केला. आता माझे सोयाबीन अचलपूर येथील बाजार समितीमध्ये पडले आहे. सोयाबीनचा खर्चसुद्धा निघत नाही, असा भाव मिळत आहे. सरकारने याबाबत योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

advertisement

शेतकरी खडके म्हणाले की, 4 एकरमध्ये 12 क्विंटल सोयाबीन झाले. 3500 रुपयांनी सोयाबीन मागत आहे. एकरी खर्च 15 हजार रुपये इतका लागतो. सोयाबीन लागवड खर्च सुद्धा निघत नाही.

शेतकरी संतोष रोही सांगतात की, 30 एकर शेत लागवडीचे होते. 7 एकर शेत घरचे होते. यात मी 20 एकरमध्ये सोयाबीन पेरणी केली होती. 3300 रुपये किमतीची बियाणे बॅग होती आणि सोयाबीनला भावही 3200 ते 3300 रुपये इतकाच आहे. सोयाबीन सोंगणे 3500 रुपये आणि काढणीचे पैसे 1500 रुपये एकर लागले आहे. म्हणजेच सोयाबीन पूर्ण तोट्यात आहे. सोयाबीन तेलाचे भाव वाढले. पण सोयाबीनचे भाव अजूनही वाढले नाही. सोयाबीनवर विविध रोग पडल्याने उत्पन्न कमी झाले. एकरी 1 ते 2 क्विंटल पासून उतार लागला आहे.

advertisement

Two Brothers Milkshake Studio : दोन मित्रांची कमाल, आज महिन्याला कमावतायेत लाख रुपये, VIDEO

शेतकऱ्याने ऑनलाईन नोंदणी केली तरी सुद्धा त्यात व्यापारी वर्ग मजा करतो. शेतकऱ्यांच्या नावावर व्यापारी वर्गच माल विकतो. सरकार खरेदी सुरू करेल तेव्हा एकाही शेतकऱ्याच्या घरात सोयाबीन राहणार नाही. कारण मजुराला मजुरी देण्यासाठी शेतकऱ्याला घरातील माल हा लवकर विकावा लागतो. तेव्हा मिळेल त्या भावात शेतकरी शेतमाल विकतो. हे सर्व फसवणुकीचे धंदे आहेत. जेव्हाच्या तेव्हा जर खरेदी सुरू झाली तर शेतकऱ्याला भेटू शकते. नाहीतर सर्व व्यापाऱ्यांना मिळते. 

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कापूस आणि सोयाबीन दरात पुन्हा वाढ, तुरीला काय मिळाला भाव? एका क्लिकवर चेक करा
सर्व पहा

सोयाबीनची आर्द्रता चेक केली जाते, तेव्हा मशीन वापरतात. हे फक्त दाखवण्यापुरते असते. सर्व कागदोपत्री चोचले आहेत. शेतकऱ्यांचा माल शेतातून आला तर तो ओला असणारच आहे. शेतकऱ्यांचा माल आहे, त्या भावात आहे तसा खरेदी करावा, असेही ते म्हणाले.

मराठी बातम्या/कृषी/
सोयाबीनला जेमतेम भाव; खर्चही निघत नाहीये, अमरावतीमधील शेतकरी संतप्त, VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल