TRENDING:

Valentines Day ला खिशाला कात्री, गुलाबाला सोन्याचं मोल, किती मोजावे लागणार? Video

Last Updated:

Valentines Day 2026: व्हॅलेंटाईन डेच्या काळात गुलाबाच्या बाजारात मोठी उलाढाल पाहायला मिळत आहे. एरवी 10 रुपयांना मिळणारे फुल आता 40 ते 50 रुपयांना विकले जात आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: येत्या 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा केला जाणार आहे. जगभरात हा दिवस प्रेमाचा दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवशी अनेकजण आपल्या प्रेमाची खुलेपणाने कबुली देतात. तसेच, या दिवशी अनेकजण आपल्या प्रियकर किंवा प्रियसीसाठी भेटवस्तू आणि विशेषतः गुलाबाचे फूल देतात. या काळात गुलाबाच्या फुलांची मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे दरात देखील मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे.
advertisement

व्हॅलेंटाईन डेच्या काळात गुलाबाच्या बाजारात मोठी उलाढाल पाहायला मिळत आहे. एरवी 10 रुपयांना मिळणारे फूल आता 40 ते 50 रुपयांना विकले जात आहे. या बाजारभावाबाबत शशिकांत सुक्रे यांनी लोकल 18 ला माहिती दिली.

सहा वर्षांपूर्वी घर सोडलं, अनेकांनी फसवलं, ‘ती’ ओरडतच मंदिरात आली अन् आयुष्य बदललं, संभाजीनगरात काय घडलं?

advertisement

फेब्रुवारी महिन्याची सुरुवात होताच गुलाबाच्या बाजारभावात मोठी वाढ पाहायला मिळाली. फेब्रुवारी हा महिना प्रेमाचा मानला जातो. या महिन्यांत अनेक डे साजरे केले जातात. आपल्या प्रियकर किंवा प्रियसीसाठी अनेकजण गुलाबाचे फूल खरेदी करतात, त्यामुळे फुलांच्या किमतीत साधारण 25 ते 30 टक्क्यांची वाढ होते. तसेच, या काळात जगभरात गुलाबाच्या फुलाची मागणी मोठ्या प्रमाणात असते ज्यामुळे फुलाचा तुटवडा निर्माण होतो आणि बाजारभाव आणखी वाढतो, असे शशिकांत सांगतात.

advertisement

View More

‘व्हॅलेंटाईन डे’ला खिशाला कात्री

फेब्रुवारी महिना सुरू झाल्यापासून गुलाबाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आधी एक गुलाब खरेदी करण्यासाठी साधारणपणे 10 रुपये मोजावे लागत होते, तर आता त्यासाठी 30 ते 40 रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच, गुलाबाच्या बुकेच्या किमतीतही मोठी वाढ पाहायला मिळत आहे. एरवी 150 रुपयांना मिळणाऱ्या बुकेसाठी आता तब्बल 250 ते 300 रुपये मोजावे लागणार आहेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: कृषी मार्केटमध्ये उलटफेर, कांदा, केळीनं वाढवलं टेन्शन, लिंबू अन् द्राक्षांना किती मिळाला भाव?
सर्व पहा

दरम्यान, गुलाबाचे दर वाढल्याने व्हॅलेंटाईन डे साजरा करणाऱ्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे. मात्र शशिकांत सुक्रे यांनी सांगितले की, व्हॅलेंटाईन डे नंतर गुलाबाच्या किमतीत घट होऊन पुन्हा ते परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध होईल.

मराठी बातम्या/कृषी/
Valentines Day ला खिशाला कात्री, गुलाबाला सोन्याचं मोल, किती मोजावे लागणार? Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल